पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी व मावळ तालुक्यातील सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करून त्यांचा शाश्वत विकास करण्याच्या मागणीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना अधिकृत निवेदन सादर केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवेळी खासदार श्रीरंग बारणे हेही उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सात गावे समाविष्ट करून त्यांचा नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास करण्याच्या मागणीवर आता राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. चिंचवडचे भाजप आमदार शंकर जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना यासंदर्भात अधिकृत निवेदन दिले.या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना संबंधित विषयानुसार तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीवर त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिले.या वेळी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, तसेच वसंत साखरे, प्रकाश बुचडे, आनंद बुचडे, तानाजी हुलावळे, संजय जाधव, रोहन जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ व आयटी कर्मचारी उपस्थित होते.
हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे (ता. मुळशी) आणि सांगवडे, गहुंजे (ता. मावळ) यांना महापालिकेत समाविष्ट करण्याचे निवेदन आहे.या भागांचा समावेश करण्यासाठी महापालिकेने २०१८ सालीच प्रस्ताव पाठवला होता, मात्र अद्याप निर्णय लांबणीवर आहे.
कोणती आहेत ही गावे?
* हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे (ता. मुळशी), सांगवडे व गहुंजे(ता. मावळ)
या सात गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्यासाठी २०१८ सालीच महापालिकेने ठराव करून शासनाकडे सुधारित प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
मागणी मागील प्रमुख कारणे:
* राजीव गांधी आयटी पार्कमुळे या परिसरात आयटी व औद्योगिक प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत.
* मोठ्या प्रमाणावर आयटीयन्स व बाहेरील नागरिक येथे स्थायिक झाले आहेत.
* या सात गावांची एकत्रित तरंगती लोकसंख्या अंदाजे २ लाखांवर पोहोचली आहे.
* यामुळे रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, वाहतूक यंत्रणा यावर ताण वाढला आहे.
* विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने विकासकामे रखडली आहेत.
समावेश झाल्यास होणारे फायदे
1. एकसंध नागरी प्रशासनाखाली नियोजनबद्ध व शाश्वत विकास
2. समन्वित व जलद निर्णयक्षम व्यवस्था
3. वाहतूक समस्यांवर ठोस उपाय
4. आवश्यक नागरी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध
5. उद्योग व आयटी क्षेत्राला भरपूर सहकार्य
6. शासनाच्या महसुलीत वाढ
“या भागांचा विकास ग्रामपंचायतीच्या क्षमतेबाहेर गेला आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी आणि नियोजनबद्ध नागरीकरणासाठी या गावांचा तातडीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश होणे अत्यावश्यक आहे,” आमदार शंकर जगताप म्हणाले, “या गावांचा विकास ग्रामपंचायतींच्या क्षमतेबाहेर गेला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी या गावांचा महापालिकेत समावेश अत्यावश्यक आहे.”या मागणीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे लवकरच निर्णय अपेक्षित आहे.