सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 क्राईम

आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

डिजिटल पुणे    08-07-2025 18:03:51

बीड : भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (७ जुलै) रात्री १०.३० ते ११ दरम्यान आष्टीहून पुण्याकडे जात असताना सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामरगाव परिसरात झाला.नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सुपा पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सागर सुरेश धस हे स्वतः वाहन चालवत असताना त्यांच्या कारने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले असून, सुपा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

आमदार धस यांचा मुलगा सागर धस बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमाराला अहिल्यानगर-पुणे महामार्गावरून प्रवास करत होता. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागरच्या कारनं त्याला जोरदार धडक दिली. याप्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. 

सागर धस हा आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान सागर धस याने वडिलांसाठी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आणि प्रचाराची धुरा सांभाळली. सागर धसचे शिक्षण पुण्यात झालं आहे. सागर हा आष्टी मतदारसंघात युवा नेता म्हणून ओळखला जातो. मतदारसंघात सुरेश धस यांच्या अनुपस्थितीत विविध सामाजिक कार्यक्रमात सागर धस याचा सक्रिय सहभागा पाहायला मिळतो. 


 Give Feedback



 जाहिराती