उरण : ०८ जुलै २०२५ रोजी केळवणे येथील को.ए.सो हायस्कूल केळवणे येथे एकविरा कला,क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था पनवेल व श्री.बी.के.पाटील फाऊंडेशन, केळवणे यांच्या मार्फत थोर निरुपणकार ,महाराष्ट्र भुषण डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिना निमित्ताने बंधारा सुरक्षित होण्यासाठी झाडे वाटप व डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी निसर्ग मित्र पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.सदर कार्यक्रमास केळवणे गावच्या उपसरपंच सुवर्णा वि.गावंड ,ग्रामपंचायत सदस्या आरती कोळी,सामाजिक कार्यकर्ते भोईर व शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
तेजस पाटील आणि विशाल घरत यांच्या मार्फत झाडे देण्यात आली.बंधारा सुरक्षित होण्यासाठी हा प्रयत्न आहे,असे मत तेजस पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी किरण कोळी,प्रॉमिस कोळी,गुरुनाथ पाटील यांना डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी निसर्ग मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. एकंदरीत सदर कार्यक्रम मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.