सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 विश्लेषण

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात लढाऊ विमानाचा अपघात; दोन मृतदेह सापडले, परिसरात खळबळ

डिजिटल पुणे    09-07-2025 15:26:49

चुरू (राजस्थान) :  राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासनाची पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार आकाशात मोठा आवाज झाल्यानंतर शेतामध्ये आग आणि धूर पाहायला.  विमान क्रॅश झाल्यानंतर घटनास्थळी दोन मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेहाची स्थिती देखील खराब असल्याची माहिती आहे. प्रशासनाकडून मृताची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच रतनगढमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आहे. भारतीय हवाई दलातील दुर्घटनाग्रस्त विमान जग्वार असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील *जग्वार* प्रकारातील लढाऊ विमान असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसून आले. स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, आकाशात मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर हे विमान शेतात कोसळले. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.

घटनास्थळी प्रशासनाने तातडीने धाव घेतली असून, पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी सध्या तपासासाठी घटनास्थळी उपस्थित आहेत. या दुर्घटनेत दोन मृतदेह आढळले असून, त्यातील एक मृतदेह पूर्णपणे छिन्नविच्छिन्न स्थितीत आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय हवाई दलाकडून लवकरच यासंदर्भात तपास सुरू केला जाणार असून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे रतनगड परिसरात आणि हवाई दलामध्ये खळबळ माजली आहे.

भारतीय वायुसेनेचे विमान क्रॅश झाल्यावर त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला. या विमानाचे पायलट शहीद झाल्याचे समजते आहे. मात्र भारतीय वायुदलाने अजून अधिकृत माहिती दिलेली नाही. घटना घडताच स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. आग विझवण्यासाठी लोकांनी प्रयत्न केला मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होत होते.

विमान क्रॅश,पायलट शहीद

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार,चुरुचे पोलीस अधीक्षक जय यादव यांच्या माहितीनुसार सैन्य दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं. ते विमान झाडावर कोसळलं,त्यामुळं झाड देखील जळून गेलं. या ठिकाणी दोन मृतदेह आढळतात.दुर्घटनास्थळी हवाई दलाचं पथक दाखल झालं आहे.  विमानाचा मलबा एकत्र करण्याचं काम केलं जात आहे. 


 Give Feedback



 जाहिराती