सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 विश्लेषण

शिक्षकांच्या परिस्थितीला विरोधक जबाबदार; विनाअनुदानित शिक्षकाच्या आंदोलनावरून सीएम देवेंद्र फडणवीसांचा आरोप

डिजिटल पुणे    09-07-2025 17:55:17

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचं आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे. दरम्यान, शिक्षकांसाठी आता शरद पवार मैदानात उतरले आहेत. दरम्यान, यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांच्या परिस्थितीला विरोधकांना जबाबदार धरले आहे. टप्पा अनुदान अजूनही न मिळाल्याने हे सर्व शिक्षक आंदोलन करत आहेत.  यासर्वाच खापर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर फोडले आहे.विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर फडणवीस यांनी विधानपरिषदेत महाविकास आघाडीकडे बोट केले. 

आझाद मैदानात शिक्षक बसले आहेत. टप्पा अनुदानाचा निर्णय सरकारने घेतला, पण आचारसंहिता जाहीर होईपर्यंतचा हा जीआर आहे असा आम्हाला संशय आहे. गिरीश महाजन तिथे गेले त्यांनी बैठक लावू असं आश्वासन दिलं. सकाळपासून सरकारच्या बोलावण्याची वाट ते बघत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटीसाठी बोलावावं. असे मत विधानपरिषदेत सतेज पाटील यांनी मांडले. 

यावर बोलताना फडणवीस म्हणाले, शिक्षकांच्या या परिस्थितीला सतेज पाटील तुमच सरकार जबाबदार आहे. तुम्ही सर्वांना सरसकट विना अनुदान संस्थांना परवानगी दिली. त्यानंतर कायम शब्द तुम्ही काढला. अनुदानाचा पहिला टप्पा आमच्या सरकारने दिला. तुमचं महाविकास आघाडी सरकार असताना तुम्ही काय केलं? काहीच केलं नाही. 

आम्हीच टप्पा अनुदान देत आहोत. परंतु तुम्ही आझाद मैदानात जाऊन राजकारण करत आहात. हे राजकारण कारण योग्य नाही. मी गृहमंत्री आहे कोण काय करत हे आम्हाला दिसतं. आम्ही त्यांच्याबाबत निर्णय घेणार आहोत. आम्ही त्यांना आज बोलावलं देखील आहे. 

उद्धव ठाकरेंचा सवाल

 महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की आमचं सरकार आता नाही तुमचं सरकार आहे मग तुम्ही का करून दाखवत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हास्य जत्रा सुरू आहे आणि हास्य जत्रा संपल्यावर शिक्षकांना मदत करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शरद पवारांनी घेतली आंदोलक शिक्षकाची भेट 

शिक्षकांवर संघर्ष करण्याची वेळ येण हे राज्यासाठी अशोभनीय असल्याचे विधान त्यांनी केलं आहे. तसेच, यावेळी त्यांनी एका दिवसाच्या आत तुमच्या मागण्या मार्गी लावतो असे आश्वासनदेखील दिले आहे.

सरकारची जबाबदारी आहे की, जे जे गरजेचे आहे त्याची तरतूद करुन लोकांना न्याय देण आणि ही जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. माझी विनंती आहे की, शिक्षक नवी पीढी घडवणारा घटक असून त्यांच्यावर असा संघर्ष करण्याची वेळ येणं ही बाब राज्याला शोभणारी नाही. ज्यांच्याकडे ज्ञानदानाची जबाबदारी त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका हेज माझे राज्य सरकारला सांगणे आहे. 

त्यामुळे लवकरात लवकर त्यासाठी लागेल त्या निधीची तरतूद करा आणि तो द्यायला सुरुवात करा.  राज्याच्या शिक्षकांचा सन्मान करा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यात येईल. प्रशासनासंबंधी काही काळजी करु नका. ५६ वर्षापासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेत काम केले आहे. त्यामुळे कसा निर्णय घ्यायचा कशी तरतूद आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला माहिती आहे. असं सांगत शिक्षकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 


 Give Feedback



 जाहिराती