पुणे : पुण्यात धक्कदायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. नवरा बायकोच्या भांडणात ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना दौंड तालुक्यातील केडगागमध्ये घडली. अवधूत मेंगवडे असे मृत चिमुकल्याचं नाव आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सचिन मेंगवडे हे केडगावमध्ये राहतात. किरकोळ गोष्टीवरून त्यांचे बायकोसोबत भांडण सुरू झालं. त्यावेळी बायकोने नवऱ्याला मारण्यासाठी त्रिशूल घेतला. पण तो त्रिशूल बाजूला भावजयेच्या कड्यावर असलेल्या मुलाला लागला.जखमी झालेल्या चिमुकल्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याचा जीव वाचू शकला नाही. नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. असं असली तरी पोलिसांना वेगळाच संशय येतोय. हा प्रकार कोणत्या अंधश्रद्धेतून घडला आहे का या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत