उरण - गुरुपौर्णिमा सणाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याहि वर्षी ॐ साई सेवा मंडळ चिरनेर तर्फे श्री महागणपती मंदिर चिरनेर (उरण) ते श्री साई मंदिर वहाळ (पनवेल) दरम्यान श्री साईबाबाची पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री महागणपती मंदिर चिरनेर येथून वारकरी दिंडी पदयात्रा गुरुवार दि १०/७/२०२५ रोजी सकाळी ११ वा. श्रीची आरती करून साई मंदिर वहाळ येथे प्रस्थान झाली.
यंदाचे हे पदयात्रेचे १३ वे वर्ष होते.पालखी गव्हाण फाटा येथे आली असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा निमित्त चिरनेर ते वहाळ श्री साई मंदिर पायी जाणाऱ्या पदयात्रीना, साई भक्तांना साबुदाणे खिचडीचे वाटप करण्यात आले.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोलीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.साई भक्तांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले.चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याने ॐ साई सेवा मंडळ चिरनेर तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य तसेच ओम साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोलीचे पदाधिकारी सदस्यांचे सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला.