सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 विश्लेषण

पहाटे ६ वाजताच अजितदादांची हिंजवडीत धडक; अधिकाऱ्यांना रविवारी सकाळी उठवून लावले कामाला

अजिंक्य स्वामी    13-07-2025 11:49:07

हिंजवडी, पुणे - आज पहाटे ६ वाजल्यापासून पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी परिसरातील विविध समस्या आणि पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट स्थळ पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी स्थानक क्र. ०६ क्रोमा, हिंजवडी स्थानक क्र. ०३, हिंजवडी स्थानक क्र. ०२, हेलिपॅड सर्कल, माण रोड, माण गाव, लक्ष्मी चौक आदी ठिकाणी पाहणी केली.

उपमुख्यमंत्र्यांच्या या पहाटेच्या धडक पाहणी दौऱ्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला रविवारी पहाटेच उठवून तातडीने कामाला लागावे लागले. पावसाचे साचलेले पाणी, खड्डेमय रस्ते, प्रचंड वाहतूक कोंडी, अपुऱ्या पायाभूत सुविधा यावर सविस्तर चर्चा झाली. स्थानिक नागरिकांनी आणि आयटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून या समस्यांकडे लक्ष वेधले होते. याची दखल घेत अजितदादांनी स्वतःच सकाळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.

दौऱ्यात उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तात्काळ उपाययोजना कराव्यात, समस्या दूर करण्यासाठी वेळेच्या चौकटीत काम पूर्ण करावे, अशा सक्त निर्देश त्यांनी दिले. अनेक कामांना प्रत्यक्षात सुरुवातही झाली आहे.

हिंजवडीतील वाहतूक, पायाभूत सुविधा आणि मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या अडचणी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

“समस्या केवळ पाहण्यासाठी नाही, तर त्या सोडवण्यासाठीच इथे आलो आहे. प्रत्येक कामाला वेळमर्यादा ठरवून दिली आहे. त्यानंतरही टाळाटाळ केली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल,”

— अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, PMRDA आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषद अधिकारी, मावळ व मुळशी उपविभागीय अधिकारी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

 


 Give Feedback



 जाहिराती