बार्शी : बार्शी शहर व तालुक्यामध्ये सर्व धर्मीय सण, उत्सव मोठया उत्साहात व आनंदाने साजरा केले जातात. हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे उत्सव मोठ्या भक्तीभावाने व एकोप्याने साजरे केले जातात. प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी एकादशी निमित्त श्री भगवंत उत्सव मूर्तीची रथयात्रा व मोहरम निमित्त सवारी मिरवणूक मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त श्री भगवंत दर्शनासाठी सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यातून विविध पायी दिंड्या च्या माध्यमातून जवळपास अडीच लाख भाविक बार्शीमध्ये दाखल झाले होते.
या सोहळ्याप्रसंगी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, जातीय तेढ निर्माण होऊ नये, सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी बार्शी शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. या वारी दरम्यान लाखो भाविकांची गर्दी असताना, बार्शी शहरामध्ये एकही अनुचित प्रकार घडलेला नाही.
बार्शी पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामागिरीबद्दल डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना बार्शीच्या वतीने, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व #सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य प्रसिद्ध प्रमुख धिरज शेळके, बार्शी तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, सचिव किरण माने, शंकर लाखे, जिल्हा कार्यकारिणी सदस्या राजश्री गवळी, श्रीशैल माळी, भूषण देवकर, फुलचंद जावळी आदी मान्यवर उपस्थित होते.