सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या जेनिशाला आर्थिक मदतीची गरज

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    14-07-2025 16:01:48

उरण : उरण तालुक्यातील बोकडविरा येथील जेनिशा प्रथमेश पाटील (वय २ वर्षे,४महिने) हिला SMA (spinal muscular atrophy  type -३) या गंभीर आजाराने ग्रासले आहे. सध्या तिच्यावर वाडीया चिल्ड्रेन हॉस्पिटल परळ तसेच नायर हॉस्पिटल मुंबई सेंट्रल या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलने जेनिशच्या गंभीर आजार असलेल्या एस.एम.ए या आजाराचे निदान करण्यासाठी ५ कोटी खर्च येणार असल्याचे सांगितले आहे. जेनिशा हिच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घरची परिस्थिती नाजूक आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने मुलीच्या गंभीर उपचाराचा सर्व खर्च तीचे आई वडिल करू शकत नाही.त्यामुळे आई व वडिल दोघांनीही विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी जेनिशाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. SMA type ३ हा एक दुर्मिळ आजार आहे. व याच्यावर वेळीच उपचार न केल्यास हा आजार मुलीचे सर्वच अवयव हळूहळू निकामी करू शकतो.

हा आजार झालेली व्यक्ति कालांतराने आपली हालचाल बंद करतो. जेवणही कायमचे बंद करतो. अशा या गंभीर रोगाचे वेळीच इलाज करणे गरजेचे आहे. असे डॉ. शिल्पा कुलकर्णी नुरोलॉजिस्ट वाडिया हॉस्पिटल परळ मुंबई तसेच डॉ अल्पना कोंडेकर नायर हॉस्पिटल मुंबई यांनी सांगितले आहे.सर्वांनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलत सढळ हाताने आर्थिक मदत केल्यास जेनिशाचे प्राण वाचू शकतात. एक चांगले पुण्य कर्म आपल्या हातून होऊ शकते. म्हणून ज्यांना ज्यांना आर्थिक मदत करायचे आहे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया अकॉउंट नंबर - 30509262966 , IFSC कोड -SBIN0009832 या खात्यावर आर्थिक मदत पाठवू शकता.


 Give Feedback



 जाहिराती