सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 DIGITAL PUNE NEWS

अखेर शिक्कामोर्तब! जयंत पाटील यांचा राजीनामा, राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची घोषणा

डिजिटल पुणे    15-07-2025 17:12:50

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आज भाकरी फिरवली असून, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या आणि जयंत पाटलांच्या चर्चाना आज अखेर पूर्ण विराम लागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू होत्या. जयंत पाटील यांनी गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळली. गत 10 जून रोजी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली होती. आज अखेर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. आता शशिकांत शिंदे यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला चांगला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आज मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही त्यांनी शरद पवारांची साथ दिली. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांना मोठा अनुभव आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. या बैठकीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे, मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांच्यासह खासदार आमदार तसेच पक्षातील प्रमुख नेते तथा पदाधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती