सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 विश्लेषण

पुण्यात कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात १४ हरणांचा मृत्यू; नेमकं कारण काय ?

डिजिटल पुणे    15-07-2025 17:39:00

पुणे  : पुण्यात कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी संग्रहालयात मागील आठ दिवसात तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.या प्राणी संग्रहालयात एकूण ९८  हरणे आहेत. यापैकी गेल्या आठ दिवसात १४ हरणांचा मृत्यू झालाय. या हरणांना दिलेल्या अन्नाचे नमुने रोग अन्वेषण विभाग यांच्याकडे पाठवले आहेत.कात्रज येथील प्रसिद्ध राजीव गांधी प्राणी उद्यानात मागील चार ते पाच दिवसांत तब्बल १४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, प्राणी उद्यान प्रशासनालाही याचा मोठा धक्का बसला आहे.

उद्यानामध्ये सध्या एकूण ९८ हरिणे होती. त्यामधील १४ हरणे मृत अवस्थेत आढळून आली असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना समोर येताच प्राणी चिकित्सक तसेच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार हरणांचा मृत्यू कोणत्यातरी विषाणूजन्य आजार, अन्नातील बिघाड किंवा अचानक हवामान बदल यामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी मृत हरणांचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणी अहवालासाठी २ ते ३ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्राणी उद्यानातील हरिणांच्या देखभाल व आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणी प्रेम करन करण्यात येत आहे. राजीव गांधी प्राणी उद्यान हे पुणेकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे आकर्षण केंद्र आहे. अशा ठिकाणी प्राण्यांच्या मृत्यूच्या घटनांनी उद्यान प्रशासनाची कार्यपद्धती आणि दक्षतेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

"प्राणी संग्रहालयामध्ये सांभार, चितळ आणि हरणांचे कळप एकत्र राहत होते. मृतप्राण्यांच्या विच्छेदनानंतर येणाऱ्या अहवालात कारण स्पष्ट होईल. साथीच्या आजारामुळे 14 हरणांचा मृत्यू झाले असण्याची शक्यता आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे दोन दिवसांमध्ये अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर बोलता येईल."

- डॉ.राजकुमार जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी आणि राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज.


 Give Feedback



 जाहिराती