सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

नागपूर, अमरावती जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा मंत्री गिरीश महाजन व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

डिजिटल पुणे    16-07-2025 14:11:09

मुंबई  : नागपूर व अमरावती जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा कामांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेऊन सिंचन प्रकल्पांची कामे गतीने करावीत, असे निर्देश दिले.विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस आमदार चरणसिंग ठाकूर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे, मुख्य अभियंता संजीव टाटू, विदर्भ विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत गोसेखुर्द प्रकल्प, पेंच प्रकल्प, अमरावती जिल्ह्यातील प्रकल्प, चिंचघाट प्रकल्प, जिगांव प्रकल्पाच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला, तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या शासनाकडे  असलेल्या विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला.जलसंपदा विभागाने सिंचन प्रकल्पांची कामे गतीने करावीत. या प्रकल्पाच्या कामासाठी निधीची तरतूद केली जाईल, असे बैठकीत सांगण्यात आले. पेंच डावा व उजवा कालवा दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती