सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

उलवे नोड मधील पाणी प्रश्न सोडविण्याची उलवे येथील सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    16-07-2025 14:16:16

उरण : उलवे नोड मधील पाणी प्रश्न संदर्भात पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा यासाठी उलवे मधील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत बाकळकर,गजानन जाधव,साई पैकडे,शशिकांत कांबळे यांच्यासह आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी  पि. एस.फुलारी(ऍडीशनल चीफ इंजिनिअर )सिडको भवन ३ मजला बेलापूर नवीन मुंबई यांची भेट घेऊन  उलवे मधील पाणी प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी केली आहे.मागणीचे त्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

 उलवे मधील वाढती लोक वस्ती, लोकसंख्या पाहता उलवे नोड मध्ये खूप कमी प्रमाणत पाणी येत आहे आणि त्यामुळे रहिवाशी यांना मोठया पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.सेक्टर ८, सेक्टर ९ सेक्टर १० ह्या सेक्टरला मोठे टॉवर आहेत. त्यांना जास्त प्रमाणत पाणी जाते त्यामुळे छोटया सोसायटीला पाणी जात नाही  त्यासाठी प्रशासनाने काही तरी वेगळा नियोजन करावे किंवा वेगळी वेळ ठरवावी.तसेच सेक्टर ९ भूखंड क्रमांक ४९ ते ५५ हया सोसायटींना आज ६ महिने झाले पाणी नाही आहे आणि शासना मार्फत जो टँकर दिला जातो तो नियमित येत नाही आणि पुरतं देखील नाही.सेक्टर १७ भूखंड क्रमांक २६० ते ३९७ जावळे गाव हा पूर्ण सिडकोच्या अंतर्गत येतो आणि हा पट्टा जास्त प्रमाणत टेकडीचा आहे त्यामुळे तिकडे सुद्धा पाणी जात नाही.

सेक्टर १५,१६,१७ या सेक्टर मध्ये सुद्धा पाईप लाईन फिरून जात असल्यामुळे छोटया सोसायटी पर्यंत पाणी पोचत नाही.बामणडोंगरी स्टेशन समोरील बिल्डिंग मध्येही पाणीपुरवठा होत नाही.यासाठी या सर्व समस्या सुटाव्यात या हेतूने उलवे मधील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत बाकळकर,गजानन जाधव,साई पैकडे,शशिकांत कांबळे यांच्यासह आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी  पि. एस.फुलारी(ऍडीशनल चीफ इंजिनिअर )यांची भेट घेऊन, निवेदन देऊन काही उपाय योजना सुचविले आहेत. त्या उपाययोजनाची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आली.

 उलवे नोडला कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने उंचावरील काही इमारतींना कमी पाणीपुरवठा होतो. (त्यांना पंप लावावा लागतो).उलवे नोडसाठी मास्टर बॅलेंसिंग टँक (एमबीआर) बांधलेला नाही. परिणामी सतत कमी दाबाने पुरवठा होत राहतोआणि देखभालीदरम्यान धरणाच्या बाजूने पाणि बंद पडल्यास पाणीपुरवठा होत नाहीं.पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी देत असल्याने  किमान आवश्यक पाणी पुरवत होत नहीं.नजीकच्या भविष्यात उलवे नोडमध्ये जलद बांधकाम आणि अधिक लोकसंख्या वाढ लक्षात घेता, सिडकोकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले पाहीजे.वरील समस्यांचे निराकरण होईपर्यंत उलवे मध्ये नवीन बांधकामासाठी कोणतेही सीसी देवू नये.अशीही मागणी यावेळी करण्यात आली.


 Give Feedback



 जाहिराती