सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 क्राईम

धक्कादायक! धावत्या बसमध्ये महिलेची प्रसूती; नवजात बाळाला धावत्या बसमधून दिले फेकून;निर्दयी मातेच्या कृत्यानं परभणीत खळबळ

डिजिटल पुणे    16-07-2025 14:40:25

परभणी  : राज्यातील परभणीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. परभणी येथे चालत्या स्लीपर बसमधून एका 19 वर्षीय महिलेने बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर नवजात बाळाला बसच्या खिडकीतून बाहेर फेकून दिल्याचं समोर आलं आहे. महिलेचा पती असल्याचा दावा करणाऱ्या एका पुरूषाने तिला चालत्या बसच्या खिडकीतून नवजात बाळाला फेकण्यास मदत केली. बसमधून रस्त्यावर पडल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाला, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले.

एक खासगी ट्रॅव्हल मंगळवारी सकाळी पुण्याहून परभणीकडे येत होती. ही बस परभणीच्या पाथरी सेलू महामार्गावरून पाथरी तालुक्याच्या हद्दीत आल्यानंतर ट्रॅव्हल बसमधून काही लोकांनी अर्भक पडल्याचं पाहिले. त्यावेळी उपस्थितांनी थेट पोलिसांना फोन करत माहिती दिली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी अवघ्या दोन तासात त्या दाम्पत्याला ताब्यात घेतले. रस्त्यावर फेकलेल्या बाळाचा मृत्यू झाला असून संबंधित महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रितिका ढेरे नावाची एक महिला संत प्रयाग ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बसने अल्ताफ शेख (जो तिचा पती असल्याचा दावा करत होता) सोबत पुणे ते परभणीला प्रवास करत होती.प्रवासादरम्यान, गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होऊ लागल्या आणि तिने एका मुलाला जन्म दिला. तथापि, त्या जोडप्याने बाळाला कापडात गुंडाळून बसमधून बाहेर फेकले. स्लीपर बसच्या चालकाला खिडकीतून काहीतरी फेकलेले दिसले. चौकशीत आरोपीने चालकाला सांगितले की त्याच्या पत्नीला बस प्रवासामुळे मळमळ झाल्यामुळे उलट्या झाल्या. दरम्यान, रस्त्यावर एका नागरिकाने बसच्या खिडकीतून वस्तू फेकलेली पाहिली तेव्हा ते बाळ असल्याचे पाहून तो थक्क झाला. त्याने ताबडतोब पोलिसांच्या 122 हेल्पलाइनवर फोन करून तक्रार केली.टनास्थळी दाखल होत पोलिसांनी सर्व घटना समजून घेतली. घटनास्थळी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी ट्रॅव्हल्सचा पाठलाग करत आरोपींना परभणी मधून ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांच्या गस्ती पथकाने या स्लीपर बसचा पाठलाग केला आणि जोडप्याला पकडले.पोलीस चौकशीनुसार ,बाळाचा सांभाळ करणं शक्य नसल्यामुळे आम्ही त्याला फेकल्याचं सदर जोडप्याने सांगितले.प्रस्तुती नंतर बाळाला बस मधून रस्त्यावर फेकून दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.हे अर्भक पुरुष जातीचे होते. रितिका ढेरे आणि अल्ताफ शेख हे परभणीचे रहिवासी होते आणि गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात राहत होते. त्यांनी पोलिसांना सांगितले की ते पती-पत्नी आहेत, परंतु या दाव्याच्या समर्थनार्थ ते कोणतेही कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले. पोलिसांनी परभणीतील पाथरी पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम ९४ (३), (५) (शरीराची गुप्त विल्हेवाट लावून जन्म लपवणे) अंतर्गत या जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती