सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 राज्य

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दणक्याने खोपटा कोप्रोली रस्त्याचे काम सुरू

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    16-07-2025 17:43:05

उरण : उरण तालुक्यातील खोपटा कोप्रोली रस्त्याची खड्ड्यांनी झालेली दुरावस्था आणि नागरिकांचे होणारे हाल याबाबत नुकतेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पीडबल्यूडी चे अभियंता नरेश पवार यांची भेट घेऊन या रस्त्याची तत्परतेने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. खड्डे बुजवून गेली दोन वर्षे या रस्त्याचे रखडलेले कॉंक्रिटीकरणाचे कामास सुरुवात न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दिला होता.  आज बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सकाळीच खोपटा पुलाच्या खाली जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार  मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व उरण तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर व तालुका संघटक  बी एन डाकी यांच्या नेतृत्वाखाली उरण पूर्व विभागातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसैनिक एकत्र येऊन निदर्शने करून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता, त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार, नरेश सोनवणे पीडब्ल्यूडी उपअभियंता व कर्मचारी यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आजपासून रस्त्याचे काम सुरू होत असल्याचे सांगितले. यावेळी या कामाचे ठेकेदार मे. पी पी खारपाटील कंपनीचे राजाशेठ खारपाटील हे उपस्थित होते.  

शिवसेना पक्ष मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न लावून धरत आहे. मागील आमसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या रस्त्याचे काम काही दिवसात सुरू होईल असे आश्वासन दिले होते. मात्र चार महिने उलटून गेल्यानंतरही हालचाल होत नव्हती. खड्ड्यांनी तसेच वाहतूककोंडीने होणारे जनतेचे हाल पाहता ढिम्म प्रशासनाला आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे असे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर म्हणाले. यावेळी तालुका संघटक बी एन डाकी उपतालुका संघटक रुपेश पाटील विभागप्रमुख भूषण ठाकूर अनंता पाटील वशेनी सरपंच अनामिका म्हात्रे, बांधपाडा माजी सरपंच शिवसेना महिला तालुका प्रमुख भावना म्हात्रे आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नरेश पवार यांना धारेवर धरत जाब विचारला. ठेकेदार राजशेठ खारपाटील यांनीही सर्वांना आश्वस्त करत हे काम लवकरच पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे व आजपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत असल्याचे सांगितले. 

या आंदोलनाला माजी तालुका प्रमुख राजीव म्हात्रे, चिरनेर सरपंच भास्कर मोकल, कोप्रोली शाखाप्रमुख रवी म्हात्रे, खोपटे शाखाप्रमुख नंदकुमार ठाकूर, रितेश ठाकूर, गणेश म्हात्रे, जयंत म्हात्रे, प्रांजल पाटील, लक्ष्मण ठाकूर, गजानन वशेणीकर दिपक म्हात्रे, गणेश वशेणीकर, महेश कोळी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसैनिकांनी घोषणा देत निदर्शने करत काही काळ रास्ता रोको केला होता.


 Give Feedback



 जाहिराती