सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परभणी जिल्ह्यात एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार
  • देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.
  • स्वतःच्या क्लास वन अधिकारी असलेल्या पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून घर-गाडीच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
  • मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा
  • मला जंगली रमी येत नाही, त्यासाठी मोबाईल नंबर, बँक अकाऊंट जोडावं लागतं, दोषी असेल तर राजीनामा देतो : माणिकराव कोकाटे
  • मोठी बातमी! मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    22-07-2025 11:22:35

मुंबई :-  राज्यात आरोग्यसेवा अधिक सक्षम करत सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन विविध योजना, उपक्रम राबवत आहे. शासनाच्या या योजना उपक्रमाबरोबरच सामान्य माणसाला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळण्यासाठी सामाजिक संस्थांचे योगदान मोलाचे ठरत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.गांधार फाउंडेशनतर्फे डीएचएल पार्क, गोरेगाव पश्चिम येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मोफत डायलिसिस सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील कोणताही रुग्ण आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये, त्याला वेळेत उपचार मिळावेत हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातात. किडनी विकार असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी गांधार फाउंडेशनने मोफत डायलिसिस सेंटर सुरू करून आरोग्यसेवेत उचलेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे. सामाजिक उत्तरदायित्व जपत मोफत डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून रुग्ण सेवेचा घेतलेला हा वसा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

गांधार फाउंडेशनमार्फत या डायलिसिस सेंटरमधून दररोज 30 रुग्णांना मोफत डायलिसिस उपचार देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी आमदार विद्या ठाकूर आणि आमदार योगेश सागर यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात गांधार फाउंडेशनच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 21 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.कार्यक्रमास आमदार विद्या ठाकूर, आमदार योगेश सागर, आमदार अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, गांधार ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन रमेश पारेख, डॉक्टर श्याम अग्रवाल, समीर पारेख आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती