सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • परभणी जिल्ह्यात एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार
  • देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.
  • स्वतःच्या क्लास वन अधिकारी असलेल्या पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून घर-गाडीच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
  • मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा
  • मला जंगली रमी येत नाही, त्यासाठी मोबाईल नंबर, बँक अकाऊंट जोडावं लागतं, दोषी असेल तर राजीनामा देतो : माणिकराव कोकाटे
  • मोठी बातमी! मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

झुडपी जंगलाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

डिजिटल पुणे    22-07-2025 15:30:59

नागपूर  : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर झुडपी जंगलाखालील जमीनीच्या स्थितीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्यासह नागपूर विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली.

विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी यावेळी सादरीकरण करून झुडपी जंगला विषयी सविस्तर माहिती दिली.  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर येत्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून झुडपी जंगलाच्या जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल होण्यासाठी गतीने कार्यवाही करण्यासह महत्वाचे निर्देश दिले.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय आयुक्तालयातील महसूल अपर आयुक्त राजेश खवले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे याबैठकीस उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती