रायगड : मा.मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात सदर अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात येत असल्याने नागरीकांना या सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.01 मे 2025 रोजी औपचारिक उद्घाटन करुन सुरु करण्यात आलेला आहे.
यामुळे राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी प्रत्येक जिल्हयातच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सहज उपलब्ध, संलग्न रुग्णालयाची यादी, अर्ज आणि पाठपुराव्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही तसेच अर्ज स्विकृती व सध्यस्थिती इत्यादी मदत पुरवली जाणार आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :-अर्ज (विहीत नमुन्यात), रुग्ण दाखल असल्यास Geo Tag फोटो.3. वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह (रुग्णालय खाजगी असल्यास जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष-वैद्यकीय अधिकारी, अधिष्ठाता, अधिक्षक, संबंधीत विषयातील प्राध्यापक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) यांचेद्वारे प्रमाणित केलेले असावे. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. (रु.1.60 लाखपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे.) रुग्णाचे आधारकार्ड. (महाराष्ट्र राज्याचे) लहान बालकांसाठी आईच्या आधार कार्ड, संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी. अपघात असल्यास, FIR असणे आवश्यक आहे. अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे :-कॉकलियर इम्प्लांट (वय वर्ष 2 ते 6), हृदय प्रत्यारोपण,. यकृत प्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, बोन मॅरो प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांचे शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, अपघात, कर्करोग (केमोथेरपी/रेडिएशन), नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण
योजने संबंधित महत्त्वाच्या बाबीः-महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम RBSK, धर्मदाय रुग्णालये या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये उपलब्ध सीमित निधीचा वापर करून वरील योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना लाभ देण्यात येतो.रुग्णालयातून रुग्ण डिस्चार्ज झाल्यामुळे त्याची शहानिशा करणे शक्य नसल्याने अशा रुग्णांना अर्थसहाय्य देणे शक्य नाही.
राज्याबाहेरील रुग्णालयांवर राज्य शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे त्यांच्याकडून उपयुक्तता प्रमाणपत्र घेणे शक्य नसल्याने राज्याबाहेरील रुग्ण/रुग्णालयांसाठी अर्थसहाय्य करणे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे.मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार 25000/-, 50000/-, 1 लाख व महत्तम 2 लाख पर्यंत आजारनिहाय मर्यादित रक्कम प्रदान करण्यात येते.