सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : मंगेश चिवटे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत
  • नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार घोषित; 1 ऑगस्ट रोजी दिला जाणार पुरस्कार
  • मराठी न येणाऱ्यांना मारहाण करुन द्वेष पसरवलात तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करेल? राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला
  • पुण्याच्या दौंडमध्ये तमाशा थिएटरमध्ये गोळीबार? डान्स करणारी तरुणी जखमी झाल्याची माहिती
  • नगरविकास खात्याच्या मोठ्या रक्कमेच्या निधीवाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल.
  • परभणी जिल्ह्यात एसटी अन् दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार
  • देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार राजकारणी असून भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव केला.
  • स्वतःच्या क्लास वन अधिकारी असलेल्या पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून घर-गाडीच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
  • मोठी बातमी! जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा
  • मला जंगली रमी येत नाही, त्यासाठी मोबाईल नंबर, बँक अकाऊंट जोडावं लागतं, दोषी असेल तर राजीनामा देतो : माणिकराव कोकाटे
  • मोठी बातमी! मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
  • सिनेमाच्या शूटिंगवेळी ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खान जखमी, उपचारासाठी अमेरिकेला रवाना; चित्रपटाचे शूटिंग दोन महिने रखडणार
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू;
  • चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तीन महिला भाविक बुडाल्या; एकीचा अजूनही शोध सुरू
  • जयंत पाटील यांचा राजीनामा! शशिकांत शिंदे होणार राष्ट्रवादीचे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे
  • युनेस्कोनं दिलेल्या वारसा स्थळांच्या निर्णयाचे राज ठाकरेंकडून स्वागत;पण त्याचसोबत…; राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा
  • अभिमानास्पद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गडांचा युनेस्को च्या जागतिक वारसा यादी (World Heritage Sites) मध्ये समावेश .
  • राजस्थानच्या चुरुमध्ये लढाऊ विमान क्रॅश, दोन मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती
  • गुजरातमधील महिसागर नदीवरील पूल मधोमध कोसळला अन् भरधाव वाहने धडाधड नदीत कोसळली; , 9 जणांचा मृत्यू
 जिल्हा

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    23-07-2025 11:56:43

नागपूर : वर्ल्डवन एनर्जी कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात चांगली सुरुवात केली असून येत्या काळात उमरेड परिसरात सौर व हरित ऊर्जेची उत्तम परिसंस्था निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.उमरेड येथील एमआयडीसी परिसरात स्थित वर्ल्डवन एनर्जी प्रा. लि. च्या १.२ गिगा वॉट क्षमता सौरऊर्जा उत्पादन सुविधेचे उद्घाटन आणि २.५ मेगा वॉट क्षमतेच्या हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ.संजय मेश्राम आणि डॉ. आशिष देशमुख, माजी आमदार सुधीर पारवे आणि राजू पारवे, वर्ल्डवन एनर्जिजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मुर्तजा कोठावाला उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्ल्डवन एनर्जी कंपनीने उमरेडमध्ये उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अधिकची २५ टक्के ऊर्जा निर्मिती होणार आहे. यासोबतच हरित हायड्रोजन ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातूनही पर्यावरण अनुकूल ऊर्जा निर्मिती होणार आहे. या दोन्ही प्रकल्पातून उमरेड परिसरात एक उत्तम परिसंस्था तयार होणार असून या भागाच्या विकासासाठी हा महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे.

वर्ल्डवन एनर्जिजचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक मुर्तजा कोठावाला यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या प्रकल्पाची पाहणी केली व सविस्तर माहिती घेतली.यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला.


 Give Feedback



 जाहिराती