सांगली : माजी विधानपरिषद सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे स्मारक बांधण्याकरिता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीमध्ये आढावा घेतला.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, सांगली महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. डी. मुधाळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, शिराळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुरज कांबळे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिराळाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद चौगुले आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिराळा तालुक्यातील मौजे कोकरुड व मौजे चिंचोली येथील जलसंपदा विभागाची एकूण ४.६७ हेक्टर आर इतकी जागा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली.
तसेच स्मारकाच्या कामामध्ये प्रशासकीय कार्यालय, फोटो गॅलरी, मंडप, पुतळ्यासाठीचा चबुतरा, वागबगिचा, उपहारगृह, कॉन्फरन्स हॉल, बैठक व्यवस्था, खुले सभागृह ओपन जीम, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी विश्रामगृह, वेध शाळा, पार्किंग एरिया, स्वच्छतागृह व चौकीदार कक्ष इत्यादी बाबींची तरतूद करुन प्रस्तावासंदर्भात लवकरात लवकर पुढील कार्यवाही करण्याच्या या बैठकीमध्ये देण्यात आल्या.