सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार घोषित; 1 ऑगस्ट रोजी दिला जाणार पुरस्कार
  • मराठी न येणाऱ्यांना मारहाण करुन द्वेष पसरवलात तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करेल? राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला
 विश्लेषण

प्रहार संघटनेकडून आज राज्यभर चक्काजाम आंदोलन ;शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू आक्रमक

डिजिटल पुणे    24-07-2025 12:01:21

अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने "शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा" या मुख्य मागणीसह राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. विदर्भात काढलेल्या पदयात्रेदरम्यान सरकारच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी लढ्याची दिशा ठरवण्यात आली. याच पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात झाली असून, राज्यभरात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी बच्चू कडू यांनी यापूर्वी ८ दिवस अन्नत्याग उपोषण केलं होते. यानंतर विदर्भात पदयात्रा काढली. त्याचवेळी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवली. आता सरकारला आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यात आली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू कडू यांच्याकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचे आक्रमक रूप बघायला मिळालं. ठिकठिकाणी टायर जाळण्यात आले. सरकार विरोधीच घोषणाबाजी करण्यात आली. शेतमजूर, दिव्यांग, शेतमजूर, मच्छिमार, मेंढपाळ अशा सर्वच समाजातील लोकांनी या चक्काजाम आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच अनेक आमदार- खासदार यांच्यासह काही राजकीय पक्षांनीही बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला.

गांधीगिरी संपली आता भगतसिंगगिरी सुरू

परतवाडा येथील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू यांनी म्हंटल, कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर येत आहेत, तर मच्छीमार, दिव्यांग, मेंढपाळ आदी घटकांच्या समस्याही गंभीर आहेत. मात्र, सरकारकडून सातत्याने दिशाभूल केली जात आहे. सरकारलाच राज्यात अशांतता हवी आहे. त्यामुळेच कर्जमाफीची घोषणा होत नाही. सरकारने जी समिती नेमली, त्याचे अध्यक्ष म्हणतात मला अध्यक्ष नेमलं म्हणून मलाही माहिती नाही. त्यामुळे आता आमची गांधीगिरी संपली आणि भगतसिंग गिरी सुरू झाली आहे. आम्ही गुन्हे दाखल होण्यास घाबरणार नाही, आता तारीख न सांगता मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला.


 News Feedback

Digital Pune
Pawar Asha
 24-07-2025 14:24:18

आदरणीय बच्चू कडू साहेब यांचा उदेश अगदी वाखाणण्याजोगी आहे.‌ ते जनतेच्या वेदना जाणवतात, विशेष तहा दिव्यांगाच्या.‌ विशेषता हा समाजातील दुर्लक्षित व वंचित घटक असून पालकांचे कसलेही उत्पन्न न बघता सरसकट महिना अनुदान मरे पर्यंत लागू करण्यास सरकार ला भाग पाडावे. या कार्यात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे तडफदार, संयमी, संवेदनशील व कमजोर घटकांना सोबत घेऊन चालणारे यांची मदत होऊ शकेल. धन्यवाद

 Give Feedback



 जाहिराती