पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा केला असता यावेळी अनेक कामांच्या त्रुटी पाहता हिंजवडीच्या सरपंचासह अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली.पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या, पुणे मेट्रो लाईन ३ प्रकल्पाची स्थळ पाहणी आणि प्रशासनाकडून वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.
आज पुण्यातील राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध स्थानिक समस्या व पुणे मेट्रो मार्गिका - ३ आदी प्रकल्पांच्या विकासकामांची पाहणी केली.यामध्ये पुणे मेट्रो मार्गिका - ३ वरील स्थानक क्र. ०६ क्रोमा, हिंजवडी स्थानक क्र. ०३, हिंजवडी स्थानक क्र. ०२, हेलिपॅड सर्कल हिंजवडी, माण रोड, माण गाव, लक्ष्मी चौक व हिंजवडी परिसरातील विविध ठिकाणी कामांचा आढावा केली. तसंच या भागात साचणारं पावसाचं पाणी, रस्त्याची समस्या, वाहतूक कोंडी यासोबतच इतर विविध समस्या जाणून घेतल्या आणि उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाकडून वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. हिंजवडी तील वाहतूक कोंडी सध्या गंभीर समस्या बनली आहे. यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यासाठी सरकार आग्रही आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा हिंजवडीत पाहणी दौरा केला असता यावेळी अनेक कामांच्या त्रुटी पाहता हिंजवडीच्या सरपंचासह अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अजित पवारांनी स्वत: पुढाकार घेत आहेत. विकास कामांना अडथळे ठरणारी अनधिकृत बांधकामे पाडा आणि जो आडवा येईल त्याला आडवा करा, अशा कडक शब्दात दादांनी प्रशासनाला सूचनाही दिल्यायत, मात्र, ग्रामस्थांना विचारात न घेता प्रशासनाकडून केला जात असलेला हिंजवडी आणि परिसरातील विकास, हा एकतर्फी असल्याचं सांगत ग्रामस्थानी आपला संताप व्यक्त केलाय. दरम्यान अद्यापही या कामांच्या मध्ये काही जण येत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी पवारांकडे करताच कामामध्ये येणाऱ्यावर 353 लावा अशा थेट सूचना दिल्या.
दोन आठवड्यापूर्वी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा पालन करत त्यांनी विकास कामांना सुरुवात केली की नाही याची पाहणी पवार यांनी सुरू केली आहे. देण्यात आलेल्या आदेशानंतर प्रशासन कामाला लागले आहे. हिंजवडीसह परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कठोर पावले उचलली जात आहे. दरम्यान, आज पाहणी करताना अनेक गोष्टी पवारांच्या निर्दशनास आल्या. यावेळी काही अधिकाऱ्यांनी कामांच्या मध्ये काही जण येत असल्याची तक्रार केली तर हिंजवडीचे सरपंच गणेश जांभुळकर कामात मंदिर जात असल्याबाबतची समस्या मांडली. यावेळी पवार भलचे संतापले.
'आपलं वाटोळं झालं.....
धरण बांधताना मंदिर जातातच ना. आपलं वाटोळं झालं आहे. आपली हिंजवडीची आयटी पार्क माझ्या पुण्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर बंगळुरु, हैद्राबादला चाललंय. तुम्हाला काही पडलं नाहीय. मी का सकाळी सहा वाजता इथे येऊन बघतोयच त्यामुळेच बघतोयना.
यावेळी पवारांनी मेट्रोच्या कामासोबत इतर समस्यांची पाहणी केली. रस्ते वाहतून कोंडी आणि इतर नागरी समस्यांबाबत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आपलं असं ठरलंय कामाच्यामध्ये कोणी आला तर त्यावर ३५३ दाखल करा.तो कोणीही असेल तरी करा.अजित पवार जरी मध्ये आला तरी ३५३ दाखल करायचा. बाकीचं कोणाचं काय ठेवायचंच नाही. ३५३ लावायचा कारण त्याच्याशिवाय हे काम होणार नाही. नाही प्रत्येक जण माझं हे करा माझं ते करा असं करत राहिलं,आपल्याला संपूर्ण काम करून टाकायचं आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.
अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश
काही दिवसांपूर्वी पवार यांनी हिंजवडीमधील समस्यांचा आढावा घेत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी सूचना करताना हिंजवडी परिसराचे सर्वेक्षण करुन अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच यावेळी त्यांनी कामे वेगाने करण्याचे निर्देशदे