सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 15-20 गाड्या एकमेकांवर धडकल्या, अनेकजण जखमी
  • लाडकी बहीण योजनेत गैरव्यवहार; तब्बल १४,२९८ पुरुषांनी लाटला योजनेचा लाभ
  • मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता; इडा पिडा टळण्यासाठी माणिकराव कोकाटे थेट शनिदेवाच्या चरणी; मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा केली
  • आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न, विमान थेट हायवेवर कोसळलं; विमानाच्या धडकेमुळे दोन कारना आग लागली ज्यामध्ये एका चालकाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तर दुसऱ्यावर घटनास्थळीच उपचार करण्यात आले.
  • मोठी बातमी : माणिकराव कोकाटेंचा मंगळवारपर्यंत राजीनामा होण्याची शक्यता,
  • नितीन गडकरींना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार घोषित; 1 ऑगस्ट रोजी दिला जाणार पुरस्कार
  • मराठी न येणाऱ्यांना मारहाण करुन द्वेष पसरवलात तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करेल? राज्यपालांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला
 विश्लेषण

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात: बोरघाटात ब्रेक फेल झाल्याने कंटेनरची 20 ते 25 वाहनांना धडक;अनेकजण जखमी

डिजिटल पुणे    26-07-2025 18:25:50

मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक दत्ता फूडमॉलसमोर दुपारी मोठा अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तब्बल20 ते 25 गाड्या एकमेकांवर आदळल्याने अनेक वाहनांचा चक्काचूर झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. भारतातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी असलेल्या या महामार्गावर दररोज दीड ते दोन लाख वाहने धावत असतात. पोलीस वाहतूक नियोजन असतानाही या अपघातामुळे संपूर्ण व्यवस्था कोलमडली असून सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहने रांगेत अडकली आहेत. घटनास्थळी पोलीस व आपत्कालीन पथक दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज एक भीषण अपघात झाला. बोरघाटात  ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने 20 ते 25 वाहनांना धडक दिली. या अपघातात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज दुपारी झाला. खोपोली  आणि लोणावळा दरम्यान, खंडाळ्याच्या  जवळ हा अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक अचानकपणे फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोरच्या वाहनांना धडक दिली. 

या अपघातात 20 ते 25 वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती आहे. अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत


 Give Feedback



 जाहिराती