सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दहशतवादाचा कोणताही रंग, धर्म नाही; मालेगाव बाॅम्बस्फोट निकाल देताना विशेष एनआयए न्यायाधीशांची टिप्पणी
  • 'माझ्याच देशाने आतंकवादी बनवलं',न्यायालयाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांना अश्रु अनावर झाले. माझ्याच देशाने मला आतंकवादी बनवलं अशी खंत व्यक्त केली.
  • मोठी बातमी: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर
  • एकीकडे भारतावर 25 टक्के टेरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केल्याचं समोर आलं आहे.
  • महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे.मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
  • रशियात भूकंपाचा जोरदार धक्का ! 8.7 रिश्टर स्केल तीव्रता नागरिक भयभीत ,अमेरिकेपासून ते जपानपर्यंत त्सुनामी अलर्ट जारी
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
 विश्लेषण

जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “संवेदनशीलता ते संकल्प: शोषणाविरोधात लढा” या राष्ट्रीय परिसंवादाचे केले आयोजन

डिजिटल पुणे    30-07-2025 14:22:49

मुंबई  –  संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने मानवी तस्करी या समस्येबाबत चर्चा व्हावी, जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “संवेदनशीलता ते संकल्प:  शोषणाविरोधात लढा” या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन बुधवार दि. ३० जुलै २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे केले आहे. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मार्गदर्शन करणार आहेत.

जगभरातील अनेक देश मानवी तस्करी या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या गुन्हेगारी विरोधात लढा देत आहेत. भारतातही मानवी तस्करी हा चिंतेचा विषय आहे. मानवी तस्करीचे प्रकार, तस्करी ओळखणे, तस्करी रोखण्यासाठी संबंधित घटकांना प्रशिक्षण, यंत्रणांतील समन्वय, पीडितांना मदत, न्यायलयीन सहाय्य आणि त्यांचे पुनर्वसन तसेच जागरूकता मोहीम आदी विषयांवर देशभरातील तज्ञ व्यक्ती या परिसंवादात विचार मांडणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परिसंवादात पोलिस, रेल्वे पोलिस दल, कायदेतज्ज्ञ, सरकारी वकील, महिला व बाल संरक्षण अधिकारी, परिवहन क्षेत्र, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती