सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दहशतवादाचा कोणताही रंग, धर्म नाही; मालेगाव बाॅम्बस्फोट निकाल देताना विशेष एनआयए न्यायाधीशांची टिप्पणी
  • 'माझ्याच देशाने आतंकवादी बनवलं',न्यायालयाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांना अश्रु अनावर झाले. माझ्याच देशाने मला आतंकवादी बनवलं अशी खंत व्यक्त केली.
  • मोठी बातमी: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर
  • एकीकडे भारतावर 25 टक्के टेरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केल्याचं समोर आलं आहे.
  • महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे.मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
  • रशियात भूकंपाचा जोरदार धक्का ! 8.7 रिश्टर स्केल तीव्रता नागरिक भयभीत ,अमेरिकेपासून ते जपानपर्यंत त्सुनामी अलर्ट जारी
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
 जिल्हा

तुळजाभवानी मंदिरात 10 दिवस गाभाऱ्यातील दर्शन बंद; भाविकांना केवळ मुखदर्शनाची परवानगी, मंदिर समितीचा निर्णय

डिजिटल पुणे    30-07-2025 17:16:30

तुळजापूर :  तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुळजाभवानी मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार, येत्या 10 दिवसांसाठी मंदिराच्या गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत भाविकांना केवळ देवीचं मुखदर्शनच करता येणार आहे. देवीच्या मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे येत्या 10 दिवसांकरिता गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून, या काळात भाविकांना केवळ मुखदर्शनाचीच परवानगी असणार आहे.

मंदिराच्या अंतर्गत काही आवश्यक धार्मिक विधी, साफसफाई व देखभालीच्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं मंदिर समितीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे गाभाऱ्यात प्रत्यक्ष प्रवेश भाविकांना मिळणार नाही. मात्र, देवीचं मुखदर्शन मंदिराच्या बाह्य भागातून करता येईल, अशी सुविधा करण्यात आली आहे.तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सिंहासन गाभाऱ्यात जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे येत्या 10 दिवसांकरिता गाभाऱ्यातील दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून, या काळात भाविकांना केवळ मुखदर्शनाचीच परवानगी असणार आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचा सिंहासन भाग अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर दुरुस्त केला जाणार आहे. त्यामुळे या भागात भक्तांना प्रवेश नाकारण्यात आला असून, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.तुळजाभवानी देवीच्या इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, या 10 दिवसांत मंदिर परिसरात दर्शनासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येणार असून, मुखदर्शनासाठी भाविकांना अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मंदिर प्रशासनाने भाविकांनी संयम बाळगावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. दर्शनाच्या या नियमात होणाऱ्या तात्पुरत्या बदलामुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त आणि मार्गदर्शन कक्षांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 


 Give Feedback



 जाहिराती