सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दहशतवादाचा कोणताही रंग, धर्म नाही; मालेगाव बाॅम्बस्फोट निकाल देताना विशेष एनआयए न्यायाधीशांची टिप्पणी
  • 'माझ्याच देशाने आतंकवादी बनवलं',न्यायालयाच्या निर्णयानंतर साध्वी प्रज्ञांना अश्रु अनावर झाले. माझ्याच देशाने मला आतंकवादी बनवलं अशी खंत व्यक्त केली.
  • मोठी बातमी: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर
  • एकीकडे भारतावर 25 टक्के टेरिफ लावणाऱ्या अमेरिकेने पाकिस्तानला मात्र झुकतं माप देत मोठा करार केल्याचं समोर आलं आहे.
  • महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महत्त्वाची सूचना आहे. कारण, येथील तुळजाभवानी देवीचे मुख्य गाभाऱ्यातील दर्शन 1 ते 10 ऑगस्ट या कालावधीत बंद राहणार आहे.मंदिर समितीचा निर्णय, भाविकांना केवळ मुखदर्शन
  • रशियात भूकंपाचा जोरदार धक्का ! 8.7 रिश्टर स्केल तीव्रता नागरिक भयभीत ,अमेरिकेपासून ते जपानपर्यंत त्सुनामी अलर्ट जारी
  • मोठी बातमी! 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
 विश्लेषण

रशियात भीषण भूकंपानंतर त्सुनामीचा कहर! जपानपर्यंत परिणाम, लाखो नागरिकांचे स्थलांतर

डिजिटल पुणे    30-07-2025 18:01:43

रशिया : रशियाच्या पूर्व भागात, कामचटकाम  प्रायद्वीपात 8.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप झाला. या शक्तिशाली भूकंपानंतर प्रशांत महासागरात त्सुनामीची लाट उसळली, ज्याचा फटका रशिया, जपान, आणि इतर किनारपट्टी देशांना बसला आहे.जपानच्या कुजी बंदर, हामानाका शहरात मोठ्या लाटा नोंदवल्या गेल्याची माहिती आहे. लाटांची उंची 20 सेंटीमीटरपासून तब्बल 60 सेंटीमीटरपर्यंत नोंदवली गेली. जपानला पुढील 24 तास त्सुनामी लाटांचा तडाखा सहन करावा लागणार आहे. दरम्यान जपानच्या विविध भागातून तब्बल ९ लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. जपानच्या हवामान विज्ञान एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार 30 सेंटीमीटर ऊंचीची पहिली लाट होक्काइडोच्या पूर्व किनारपट्टीवरील नेमुरोपर्यंत पोहोचली. प्रशांत त्सुनामी इशारा केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार हवाई, चिली, जपान आणि सोलोमन द्वीप समुहाच्या किनारपट्टीवर एक ते तीन मीटर ऊंचीच्या लाटा उसळू शकतात. रशिया आणि इक्वाडोरमध्ये किनारपट्टीच्या भागात तीन मीटरहून ऊंच लाटा उसळू शकतात.

कामचटकाममध्ये आणीबाणी जाहीर

कामचटकाम परिसरात इमारती हादरल्या, रस्ते तुटले, वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला. स्थानिक प्रशासनाने तातडीने अणीबाणी घोषित केली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

जपानमध्ये त्सुनामीचा धसका! लाखो नागरिकांचे स्थलांतर

त्सुनामीचा सर्वात मोठा परिणाम जपानच्या उत्तर किनाऱ्यावर दिसून आला. अंदाजे 3 ते 5 मीटर उंच लाटा किनारपट्टीवर आदळल्या. जपान सरकारने लाखो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं असून तात्पुरती निवासस्थाने उभारण्यात आली आहेत.

अमेरिका, फिलीपिन्स, कोरिया येथे सुद्धा अलर्ट

भूकंपानंतर प्रशांत महासागरातील अनेक देशांना त्सुनामी अलर्ट जारी करण्यात आले. अमेरिकेच्या अलास्का, हवाई बेटांपासून ते फिलीपिन्स व दक्षिण कोरिया पर्यंत प्रशासन सतर्क आहे.

रशियाच्या साखालिन सरकारच्या माहितीनुसार आज उत्तरी कुरिल डिस्ट्रीक्टमध्ये त्सुनामी आली आणि भूकंप झाली तिथं आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. पूर्व रशियाचे गव्हर्नर यांनी लोकांनी किनारपट्टीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार त्सुनामीच्या लाटा 4 मीटर ऊंचीच्या होत्या. काही भागात यामुळं मोठं नुकसान झालं आहे.

प्रशांत त्सुनामी इशारा केंद्रानं भूकंपामुळं त्सुनामी आली असल्याचं म्हटलं. ज्यामुळं सर्व हवाई बेटांच्या किनारपट्टीवर नुकसान झाल्याची शक्यता आहे. रशियाची वृत्तसंस्था 'तास' नं भूकंप केंद्राजवळील सर्वात मोठं शहर असलेल्या पेत्रोपावलोव्स्क-कामचत्स्की येथून लोक भूकंप होताच तातडीनं घराबाहेर पडून रस्त्यावर आल्याची माहिती दिली. घरांचं मोठं नुकसान झालं, इमारती जोरात हलत होत्या, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.

अमेरिका येथील अलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामी इशारा केंद्रानं अलास्का अल्यूशियन द्वीप समुहाच्या काही भागांना त्सुनामीचा इशारा दिला आहे. कॅलिफोर्निया, ओरेगन, वॉशिंग्टन, पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सुदैवाने जीवितहानी मर्यादित, मात्र नुकसान प्रचंड

प्राथमिक अंदाजानुसार जीवितहानी फारशी झाली नाही, परंतु मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान, हजारो घरांचे नुकसान आणि वाहतूक यंत्रणेवर परिणाम झाला आहे.


 Give Feedback



 जाहिराती