सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं
  • पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? फडणवीसांनी नावं जाहीर करावी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल
  • ‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
 जिल्हा

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

डिजिटल पुणे    01-08-2025 15:08:25

मुंबई  : राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घोषित केले आहे.राज्यामधील राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ होती. राज्यातील अनेक कलाकार व कलाकार संघटनांनी ही मुदत वाढवावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्याकडे केली होती. त्यांच्या विनंतीनुसार या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी १५ दिवसाची मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी घोषणा मंत्री ॲड.शेलार यांनी केली आहे. या संदर्भात सांस्कृतिक कार्य संचालनालयाने योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देशही दिले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती