सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • दिव्याच्या विजयाने मला तिहेरी अभिमान आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्या देशमुखच्या बुद्धीबळातील सुवर्ण विजयाचे कौतुक केले.
  • एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं
  • पुण्यातील एमआयडीसीमध्ये अजितदादांची दादागिरी आहे का? फडणवीसांनी नावं जाहीर करावी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर रोहित पवारांचा हल्लाबोल
  • ‘श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
  • अजित पवार यवत मधे दाखल .तणावाची परिस्थिती नियंत्रणात
 शहर

जीममध्ये सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू;पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना

डिजिटल पुणे    01-08-2025 17:28:53

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिममध्ये व्यायाम करतानाच एका ३७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. चिंचवडगावातील नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना मिलिंद कुलकर्णी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्यायाम करत असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि ते जागेवर कोसळले. त्यांना तात्काळ मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयविकाराचा झटका हे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद कुलकर्णी हे गेल्या सहा महिन्यांपासून चिंचवड गावातील एका नायट्रो जिममध्ये जात होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी जीममध्ये व्यायाम केला. त्यानंतर ते एका ठिकाणी बसले आणि त्यांनी पाणी प्यायलं. मात्र, काही सेकंदांतच त्यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले. यावेळी जीममध्ये असलेल्यांनी या प्रकारानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. मिलिंद कुलकर्णी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मृत मिलिंद कुलकर्णी यांच्या पत्नी स्वतः एक डॉक्टर आहेत. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या बनली आहे.तज्ज्ञांच्या मतानुसार, कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी पूर्ण आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. योग्य काळजी आणि तपासणी करूनच कोणताही  व्यायामाला सुरूवात करणे गरजेचे आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती