*मनविसे ने फ्रेशर्स पार्टी पाडली बंद..*
राजा रावबहादूर मिल्स येथील "किकी" नावाच्या पब मध्ये दिनांक २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा पासून एम आय टी - वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी, सिम्बायोसिस, व्ही व्हि आय टी या कॉलेज मधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती , कुठलेही ओळखपत्र न पाहता तसेच एन्ट्री चे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील १७-२१ वयोगटातील मुलांना ह्या कीकी पब चालकांनी प्रवेश दिला.
मनविसेला ही बाब समजल्यावर त्याक्षणी राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाचे जगदाळे सर यांना फोन करून सांगितले व त्या विभागाच्या वाघ मॅडम यांच्यासह थेट किकि पब मध्ये मनविसे पदाधिकाऱ्यांनी धडक दिली, त्यावेळी चालू असलेली पार्टी बंद करून पार्टी आयोजक व पब चालक यांवर ठोस कडक कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडले. आत्ता रात्री दोन वाजेपर्यंत उत्पादन शुल्क प्रशासन विभाग कारवाई करत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा फ्रेशर्स पार्टी च्या माध्यमातून तरुण तरुणींना व्यसनाधीन करण्याला ठाम विरोध आहे.इथून पुढे जर कुठल्याही पब रेस्टॉरंट्स ने जर फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पब ची एक ही काच शिल्लक ठेवणार नाही, पूर्ण पब बार फोडून टाकण्यात येईल हा थेट इशारा यावेळी दिला.
शहराध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनविसे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, उप शहर अध्यक्ष विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे, विभाग अध्यक्ष हेमंत बोळगे, आशुतोष माने, केतन डोंगरे, शहर कार्यकारिणी सदस्य प्रवीण कदम,उपाध्यक्ष अविनाश वाघमारे, विभाग सचिव मयुर शेवाळे इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते