उरण : पूर्ण देशभरात विशेषतः महाराष्ट्रात गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणरायाचे आगमन भाविकांनी बुधवारी (ता. २७) जल्लोषात केले. तसेच गणरायाचे आगमन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या `सुखकर्ता’ बंगल्यावर झाले. सुंदर रांगोळ्या, विविध प्रकारच्या फुलांची देखणी आरास आणि वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत महेंद्रशेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी `सुखकर्ता’वर केले. यावेळी बुधवारी सकाळी अकरा वाजता गणरायाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर घरत परिवारातील कुटुंबीयांनी एकत्र येऊन सवाद्य आरती केली.
यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ``बाप्पाने मला भरभरून दिले आहे. त्याच्या ऋणातच मी आहे. गणेशाच्या आशीर्वादानेच मी नुकतीच दुसऱ्यांदा महाकठीण आणि हिंदू धर्मात पवित्र समजली जाणारी कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण केली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतोय. `सुखकर्ता’ बंगल्यावर आलेला कुणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही, जे जे गरजवंत आहेत त्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी गणराया मला साथ दे, अशीच गणरायाचरणी माझी विनम्र प्रार्थना!’’
यावेळी सोनाली आणि मयुरेश चौधरी, कुणाल घरत, सेजल घरत आणि घरत परिवारातील सर्व कुटुंबीय उपस्थित होते. महेंद्रशेठ घरत यांच्या घरी बाप्पा २ सप्टेंबरपर्यंत आहे. गणेभक्त तोपर्यंत दर्शन घेऊ शकतात.दरम्यान, गणरायाच्या शुभमुहूर्तावर महेंद्रशेठ घरत यांनी आपले जुणेजाणते आणि परिस्थितीत उत्तम साथ देणारे सहकारी बाळकृष्ण म्हात्रे (ओवळे गाव) यांना नवीकोरी स्कूटर भेट म्हणून दिली. तिचे पूजन महेंद्रशेठ घरत यांच्या `सुखकर्ता’वर झाले.