वाकड – वाकड येथील वेदांता सोसायटीमध्ये सुरू असलेल्या गणेशोत्सवात गुरुवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवडचे सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक श्री. विजूसेठ पांडुरंग जगताप यांच्या हस्ते “श्री आरती” करण्यात आली.समाजकार्यातील योगदान आणि सांस्कृतिक उपक्रमांतील सक्रिय सहभागासाठी परिचित असलेल्या श्री. जगताप यांनी आरतीसोबतच सर्व रहिवाशांसाठी भंडारा महाप्रसादाचे आयोजन करून उपस्थितांची मने जिंकली. सोसायटीचे अध्यक्ष श्री. सोमनाथ बी. धोंडे, खजिनदार श्री. प्रमोद भोसले आणि सचिव सौ. स्नेहा राव यांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले.

या विशेष प्रसंगी सोसायटीच्या सांस्कृतिक समितीच्या वतीने फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे समन्वयन अस्मिता पी. रुद्रवार यांनी केले. लहान मुले, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने भाग घेतल्यामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली.

फॅशन शोच्या अनुषंगाने योगा सेशन देखील घेण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मदन पाटील यांनी केले असून, त्यांना समीर राव, सुमंत देशपांडे, प्रमोद भोसले, रमन रोपळेकर आणि जयेश गोकळे यांचे सहकार्य लाभले. या योगसत्रातून रहिवाशांना आरोग्यजागरूकतेचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.श्री. जगताप यांची उपस्थिती तसेच सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांच्या एकत्रित आयोजनामुळे हा दिवस वेदांता सोसायटीच्या रहिवाशांसाठी अविस्मरणीय ठरला.
