पुणे : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त भावनिक आणि मानसिक दृष्ट्या संतुलित राहण्यासाठीची तसेच दररोज खेळ खेळण्याची आणि दुसऱ्यांना खेळासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोत्साहन करू अशी शपथ घेतली.
हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात बुद्धिबळ मुले मुली स्पर्धा, त्याचबरोबर टेबल टेनिस मुले मुली स्पर्धा आयोजित करण्यात आल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दरेकर हर्षद याने प्रथम क्रमांक नोंदवला तर दरेकर मेघनाथ याने द्वितीय क्रमांक नोंदवला. मुलींमध्ये खोपडे मानसी हिने प्रथम क्रमांक नोंदवला तर मिरकुटे आरती हिने द्वितीय क्रमांक नोंदवला.
टेबल टेनिस मुले स्पर्धेमध्ये सुजल खुटवड याने प्रथम क्रमांक मिळवला तर विकी धरणाल याने द्वितीय क्रमांक मिळवला टेबल टेनिस मुली स्पर्धेमध्ये मेहेक शेख हिने प्रथम क्रमांक मिळवला साक्षी चांदगुडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला सर्व यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ तुषार शितोळे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. पौर्णिमा कारळे, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन केले.
या स्पर्धेचे आयोजन शारीरिक शिक्षण संचालिका पौर्णिमा कारळे, डॉ.जगदीश शेवते, प्रा. सहदेव रोडे, डॉ. रोहिदास ढाकणे, ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, डॉ.सचिन घाडगे, प्रा.गणपत आवटे, प्रा.जीवन गायकवाड, प्रा.दयानंद जाधवर, प्रा.माउली कोंडे, प्रा.महेश कोळपे, प्रा.भूषण समगीर, प्रा.ऐश्वर्या धुमाळ, प्रा.अंकिता महांगरे, वैष्णवी कोंडे, विकास ताकवले, आशिष परमार, सीमा देशमुख, मनीषा मोहिते, धनाजी माने, सुमित कांबळे, अभिषेक मोरे इ. यांनी प्राचार्य तुषार शितोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केले