सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोज जरांगेचे लाड बंद करा, त्याला उचला आणि अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची सरकारकडे मोठी मागणी
  • राजकारण चुलीत गेलं, पण दोन समाज झुंजवणे योग्य नाही; गणरायाच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका
  • मराठ्यांचं पाणी बंद केल्यास आयुक्तांना सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा बीएमसी आयुक्तांना थेट इशारा; म्हणाले, त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा!
  • जरांगेंचं आंदोलन हा राजकीय अजेंडा, लक्ष्मण हाकेंचा आरोप
  • 'हटणार नाही, इथेच उपोषण करून मेलो तरीही...'; आझाद मैदानात पोहोचताच, मनोज जरांगेंच्या 10 मोठ्या गर्जना
 DIGITAL PUNE NEWS

देशातील खेळाडू सशक्त बनावा यासाठी सार्वत्रिक काम करू – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

डिजिटल पुणे    30-08-2025 15:33:09

छत्रपती संभाजीनगर : देशाला 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनवायचं असेल, तर नागरिकांसोबत खेळाडूही सशक्त झाले पाहिजेत. देशातील खेळाडू सशक्त कसा बनेल यासाठी आपण सर्व मिळून काम करू, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात (एनसीओई) आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार डॉ. भागवत कराड, साई केंद्राच्या उपसंचालक मोनिका घुगे, सहायक संचालक सुमेश तरोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आजपासून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राला एनसीओई छत्रपती संभाजीनगर असे नाव मिळाले आहे. “छत्रपती संभाजी महाराजांच्या नावामुळे हे केंद्र खेळाडूंना नवी ऊर्जा देईल,” असे केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांनी सांगितले.

हॉकीचे जादूगार महान खेळाडू पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. यावर्षीपासून देशभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये तीन दिवस विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“नव्या क्रीडा धोरणातून खेळाडूंना गुणवत्तापूर्ण सुविधा, आधुनिक प्रशिक्षण आणि प्रोत्साहनपर वातावरण देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजीनगरचे हे केंद्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा गौरव करणारे खेळाडू घडवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्वोत्तम क्रीडा केंद्रांपैकी असलेले साई केंद्र ‘फिट इंडिया चळवळी’साठीही महत्वाची भूमिका बजावत आहे.”प्रस्ताविक उपसंचालक मोनिका घुगे यांनी केले. त्यांनी साई केंद्राच्या कामगिरीची माहिती दिली. या कार्यक्रमास खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती