पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पाचही मनाच्या गणपतींचे दर्शन घेतले. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती. हे गणपती पुण्याच्या गणेशोत्सवात विशेष महत्त्व ठेवतात.
पुण्यातील श्री कसबा गणपती या पहिल्या मानाच्या गणपतीचे दर्शन पाटील यांनी घेतले. या प्रसंगी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. तसेच, पुणे शहर सतत विकसित होऊन प्रगतीपथावर वाटचाल करत राहो, अशी कामना त्यांनी व्यक्त केली.

पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असेलला मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, श्री गुरुजी तालीम या तिसऱ्या मानाच्या गणपतीचे पाटील यांनी दर्शन घेतले आणि अनोखा आत्मानंद अनुभवला. मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीचे आणि मानाचा पाचवा तथा लोकमान्य टिळक यांच्या केसरीवाड्यातील गणपतीचे देखील पाटील यांनी दर्शन घेतले, आणि मनोभावे आरती केली.

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. यातही मानाच्या पाच गणतींचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही लोक येतात.

