सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; देवेंद्र फडणवीसांनी थेट केंद्र सरकारचं नाव घेतलं!
  • आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या, जरांगे-भुजबळांना बोलवा, जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
  • तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, छगन भुजबळांचं आव्हान
  • मराठा आरक्षण अडचणीत? राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल
  • मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरच्या GR बाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल; राज्य सरकारलाही विनंती
 व्यक्ती विशेष

उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल; राजकीय घडामोडींना वेग

डिजिटल पुणे    10-09-2025 15:22:55

मुंबई : उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. उद्धव ठाकरे राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर गेले आहेत. उद्धव हे राज आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची भेट घेणार आहेत. खासदार संजय राऊत, आमदार अनिल परबही उद्धव ठाकरेंसोबत आहेत. महानगरपालिका निवडणुकिच्या पारश्वभूमीवर आता नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. दरम्यान, आता लवकरच दसरा मेळावाही येत आहे.

उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थान शिवतीर्थ येथे दाखल आले आहेत. त्यांच्यासोबत संजय राऊत आणि अनिल परब देखील आहेत. मागील 15 दिवसांत उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले आहेत. त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांच्यातील युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे.

मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून दोघांमध्ये राजकीय युती होणार असल्याची चर्चा होती. मात्र, यावर अधिकृत शिक्कामोर्तब होऊ शकले नाही. मात्र, आता युती दृष्टिक्षेपात आली असून त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले का? याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निमंत्रण देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात होणाऱ्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे हे देखील पहिल्यांदा हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेच्या भेटीलागेल्याची चर्चा आहे.

ठाकरे बंधुंमध्ये मागील 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या दृष्टिने ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेच्या निकालानंतर मुंबईची सत्ता टिकवणे हा उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे. तर, राज ठाकरेंना देखील मुंबईतील आपली ताकद दाखवावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू आपल्या अस्तित्वासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसेच आमदार अनिल परब हे दोन उद्धव ठाकरे यांचे विश्वासू देखील सोबत आहे

काँग्रेस नेत्यांनी आठ सप्टेंबरला मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घ्यावे का या मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. या भेटीनंतर मनसेबाबत निर्णय हायकमांडशी बोलून घेणार असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. तर, युतीचा निर्णय फक्त राज ठाकरेंचं घेतली, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडेंनी लगावला होता. त्यामुळे उद्धव-राज भेटीत महाविकास आघाडीत येण्याविषयी देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती