सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
  • विदर्भात शेतकरी आत्महत्येचे भीषण वास्तव समोर; उपराजधानी नागपूर विभागात गेल्या 8 महिन्यात 296 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा
  • मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सर्वपक्षीय आमदारांची अजित पवारांकडे मागणी, कॅबिनेट बैठकीत निर्णयाची शक्यता
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
 विश्लेषण

पिंपरी-चिंचवड खरंच स्वच्छ शहर? की केवळ पुरस्कारापुरते?;अजितदादांनी विचारल्या प्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला पण शहर खरोखर स्वच्छ झाले का?

डिजिटल पुणे    11-09-2025 14:23:41

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यात आलेला पुरस्कार याची खरा अर्थाने चौकशी झाली पाहिजे की खरंच कुठल्या निकषावर हे पुरस्कार दिले?कारण शहरात गल्लोगल्ली कचराचे ढीग  नाही तर अक्षरशः डोंगर आहेतगल्लोगल्ली रस्त्यावर कचरा जमा आहे परंतु १५-२० झाले तरी कोणीही कचरा उचलत नसल्याने रस्त्यावर कचरा अक्षरशः मानवी आरोग्यासाठी धोकादायक बनतो आहे.

 पिंपरी चिंचवड हे खरंच स्वच्छ शहर आहे ?

“ स्मार्ट सिटी “ म्हणून कितीही पाठ थोपटून घेतली तरी तुम्ही “ सारथी “ वर कितीही वेळा तक्रार केली तरी त्याची दखल घेतली जात नाही. “ सारथी “ लाच दिशा नाही हे वास्तव आहे .आणखी कहर म्हणजे शहरात नागरिकांच नाही तर “ भटक्या कुत्र्यांच “ राज्य आहे त्याबद्दलही तुम्ही कितीही तक्रार करा अगदी पशुसंवर्धन अधिकारी या पदावर असलेल्या “ दगड “ अधिकाराला तुम्ही कितीही फोन केले तरी ते अजिबात हलत नाहीत.

भटक्या कुत्र्यांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले तर असुरक्षित आहेतच पण  रात्रभर सुरु असलेल्या कुत्र्यांच्या गोंगाटामुळे झोपही नाही आणि त्यांच्या क्रिडाप्रकारामुळे रस्तेदेखील अस्वच्छ आणि विष्ठामय आहेत या सर्व प्रकारामुळे नागरिकांच्या करांच्या पैशातुन नागरिकांना एवढ्या मुलभूत सुविधा देणार नसेल तर महापालिकेने कर गोळा न करता नागरिकांना या सर्वांसाठी स्वखर्चाने तजवीज करायला लावली. त्याचबरोबर कचरा टेंडर आणि भटक्या कुत्र्यांसाठीचे टेंडर यांचीही चौकशी करण्यात यावीउदाहरणादाखल या सर्व प्रकाराचा जिवंत डेमो पहायचा असेल महापालिका आयुक्तांनी संगम नगर , जुनी सांगवी येथे भेट द्यावी


 Give Feedback



 जाहिराती