सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; देवेंद्र फडणवीसांनी थेट केंद्र सरकारचं नाव घेतलं!
  • आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद घ्या, जरांगे-भुजबळांना बोलवा, जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ; राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
  • तुम्हाला EWS, राज्याचं 10 टक्के आणि ओपनमधील 50 टक्के आरक्षण नको का? शिकलेल्या मराठ्यांनी उत्तर द्यावं, छगन भुजबळांचं आव्हान
  • मराठा आरक्षण अडचणीत? राज्य सरकारच्या जीआरला उच्च न्यायालयात आव्हान, दोन याचिका दाखल
  • मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरच्या GR बाबत सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल; राज्य सरकारलाही विनंती
 व्यक्ती विशेष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजीची ठिणगी?; नेमकं काय आहे कारण?

डिजिटल पुणे    13-09-2025 12:04:31

मुंबई : गेल्या काही महिन्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत मतभेद सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. राज्याच्या नगरविकास खात्यात फडणवीस यांनी काही फेरबदल केल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे फडणवीस आणि शिंदेंमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते. मात्र याही महापालिकेवर आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

आतापर्यंत 'ड' वर्गाच्या महापालिकांवर बिगर सनदी अधिकारी नियुक्त केले जात होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महापालिकांवरही आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे साडेचार लाखाहून अधिक लोकसंख्या आणि ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसंकल्प असलेल्या १९ महापालिकांमध्ये आता सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याआधी 'अ', 'ब', आणि 'क' वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती झालेली आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याचे म्हटले जात आहे. याव्यतिरिक्त, शिंदे यांच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ED) चौकशी केल्यानेही त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांवर नाराज असताना दुसरीकडे शिवसेना शिंदे गटात देखील नाराजी नाट्य सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिंदेच्या शिवसेनेकडून विभागप्रमुखांची नेमणूक करताच पक्षातील अनेक इच्छुकांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम उपनगरांनंतर आता दक्षिण मुंबईतही नाराजी उघडपणे समोर आली आहे. शिवडी विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक नाना अंबोले यांच्या विभागप्रमुखपदी झालेल्या नियुक्तीमुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

या निर्णयाला विरोध म्हणून शिवडी विधानसभा क्षेत्रातील ५ पैकी ४ शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच, आपल्यापेक्षा नंतर पक्षात आलेल्यांना महत्त्वाचे पद दिल्यानेही काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.पक्षात प्रवेश करताना दिलेल्या वचनांची पूर्तता होत नसल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. तर आपल्यानंतर आलेल्यांना संधी दिल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच नाना अंबोलाच्या नियुक्तीच्या विरोधा पदाधिकार्यांकडून उघड उघड सह्यांची मोहिम राबवत लवकरच याबाबतचं पत्र मुख्य नेते एकनाथ शिंदेंना दिले जाणार आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुक शिंदेंसाठी महत्वाची माणली जात असताना, ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही नाराजी एकनाथ शिंदेंना परवडणारी नाहीमुंबई महापालिका निवडणुका शिंदे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील ही अंतर्गत नाराजी एकनाथ शिंदे यांच्यासाठी नक्कीच एक मोठे आव्हान आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती