*नाम फाउंडेशनच्या वतीने नाना आणि मकरंद अनासपुरे यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. : नितीन गडकरी ( केंद्रीय मंत्री)
मला याचा अभिमान आहे. महाराष्ट्रात ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्याचं मुख्य कारण म्हणजे पाणी. पाणी हीच आपली मोठी समस्या आहे. जर पाणी उपलब्ध झालं, तर आत्महत्या होणार नाहीत.
विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मी या कार्यक्रमाला याच कारणासाठी आलो आहे.
*राजकारण आणि समाजकारणाबाबत विचार*
मी राजकारण करतो, पण जेव्हा मी तिसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा लोकांना स्पष्ट सांगितलं – “तुम्हाला गरज असेल तर मला मत द्या. मी तुम्हाला चहा पाजणार नाही, फोटो लावणार नाही.”
मला एक गोष्ट लक्षात आली आहे – जो नेता समाजासाठी काम करतो त्याला प्रचाराची, जातीपातीची किंवा पंथसंप्रदायाची गरज लागत नाही.
आपण लोकांच्या भीतीमुळे आपली भूमिका बदलू नये. आपली भूमिका ठाम ठेवली पाहिजे आणि लोक आपल्यासोबत आले पाहिजेत.
म्हणूनच नाना आणि मकरंद यांनी जे काम केलं आहे त्याला मी सलाम करतो. मीही तेच काम करण्याचा प्रयत्न करतो.
सरकार आणि सामाजिक काम
सामाजिक कामात सरकारला धुरा द्यायला हवा, हे माझं ठाम मत आहे.
माझ्या कोणत्याही कामात मी सरकारी अधिकाऱ्यांवर अवलंबून राहत नाही आणि सरकारची मदतही घेत नाही. कारण सरकारचा हात जिथे लागतो तिथे समस्या सुरू होतात.
पाणी आणि शेतीबाबत विचार
या निवडणुकीत मला अनुभव आला. मी विदर्भात हेलिकॉप्टरने फिरलो.
मी जेव्हा जलसंधारण मंत्री होतो तेव्हा राज्यातील 12–13 धरणं संकलित झाली.
पाण्यासोबत शेती उत्पादन वाढलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा झाला पाहिजे.
मका या पिकाचा भाव अमेरिका ठरवते.
पश्चिम महाराष्ट्रात इतके साखर कारखाने टिकून राहिले, ते फक्त इथनॉलमुळे.
राजकारणाची नवी व्याख्या
We need to redefine politics.
जर समाजकारण करत राहिलो, तर राजकारणाची गरज भासणार नाही.
समाजातील आर्थिकदृष्ट्या शोषित आणि पीडित लोकांचं जीवन केवळ भाषण करून सुधारत नाही, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष काम करावं लागतं.
तुमच्या गेल्या दहा वर्षांच्या कामाचा इतिहास खूप चांगला आहे.
माझी प्राधान्ये
मी माझ्या प्राधान्यक्रम ठरवले आहेत.
माझं जास्तीत जास्त लक्ष आणि ताकद विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्रित आहे.
विदर्भातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची मी काळजी घेणार आहे.
समाजसेवा आणि निवडणूक
प्रत्येक राजकारणी पुढच्या निवडणुकीचा विचार करतो, पण प्रत्येक समाजसेवक पुढच्या समाजाच्या घटकाचा विचार करतो. त्यामुळे समाजसेवा हा नेहमीच एक “थँकलेस जॉब” राहतो.