सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
  • खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
  • मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
  • मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे, पाऊस अन् वाऱ्याचा वेग वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
 शहर

कोथरुड मध्ये १७ सप्टेंबर पासून 'दस्तकारी हाट ' ;देशभरातील हातमाग,वीणकामगारांच्या कलेचे प्रदर्शन

डिजिटल पुणे    15-09-2025 15:00:44

पुणे  : देशभरातील नावाजलेल्या हातमाग आणि वीण कारागिरांनी तयार केलेले कलाकुसरीचे कपडे,साड्या,शाली,कार्पेटचा समावेश असलेले  'दस्तकारी हाट ' हे प्रदर्शन हर्षल बँकवेट हॉल(कर्वे रस्ता) मध्ये  दि.१७ सप्टेंबर  ते सप्टेंबर    २०२५ पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाची  वेळ सकाळी ११ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत असेल. देशातील १२ राज्यातील ५० दालने या प्रदर्शनात असतील. 

आकर्षक कलाकुसरीच्या साड्या,ड्रेस,सूट,कुर्ती,शाल आणि  कलाकुसरीच्या वस्तू हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असून खास सणासुदीसाठी कपडे  प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.टसर,आरी सिल्क,मर्सिलीन(भागलपूर),कातण,मुंगा,ऑर्गनझा,टिस्यु(बनारस,उत्तर प्रदेश),बांधणी,ब्लॉक प्रिंट(राजस्थान),कांठा वर्क,जामदानी,कडवा (कोलकाता),अजरक,शिबोरी (गुजरात),चंदेरी(मध्य प्रदेश),मुंगा,टसर,हॅन्ड प्रिंटेड(आसाम),सिल्क कार्पेट,सिल्क प्रिंटेड साडी (काश्मीर) हे खास आकर्षण आहे.

सिल्क साड्या,चंदेरी फॅब्रिक,मुगा सिल्क,कोसा सिल्क,कलमकारी साड्या,बनारसी सिल्क साड्या,कुर्ती,बेड शिट,कार्पेट उपलब्ध करून देण्यात आला आहे.विणकामाच्या गोष्टीही एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत.प्रवेश विनामूल्य आहे.


 Give Feedback



 जाहिराती