सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात; जीपला जोरदार धडक दिली; दुचाकीचा चेंदामेदा, 8 जखमी
  • बीडमध्ये रेल्वे नव्हे तर विकासाची वाहिनी पोहोचली, गोपीनाथ मुंडेंना ही रेल्वे अर्पण : देवेंद्र फडणवीस
  • मोठी बातमी : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, ठाकरेंची सेना आक्रमक, पोलिसात तक्रार
  • पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार, तर शुक्रवारी उशीरा कमी दाबाने पाणीपुरवठा
  • कास पठार, प्रतापगडानंतर साताऱ्यातील आणखी दोन स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा; महाबळेश्वर,पाचगणी ही युनेस्कोच्या यादीत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा अन् एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
 शहर

कोथरुडमध्ये 'दस्तकारी हाट' प्रदर्शनास प्रारंभ

डिजिटल पुणे    17-09-2025 16:01:26

पुणे : कोथरुडमधील हर्षल बँक्वेट हॉल (कर्वे रस्ता) येथे  ‘दस्तकारी हाट’ हे हातमाग व वीण कारागिरांच्या कलेचे अनोखे प्रदर्शन १७ सप्टेंबर रोजी  सुरू झाले. या प्रदर्शनास  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील १२ राज्यांतील ५० दालनांमधून पारंपरिक व आधुनिक कलाकुसरीच्या साड्या, शाली, कपडे, कार्पेट आणि कलावस्तू पाहण्यासाठी व खरेदीसाठी पुणेकर येत आहेत.सकाळी ११ ते रात्री ९ अशी प्रदर्शनाची वेळ असून प्रवेश विनामूल्य आहे. 

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या रेशीमी साड्या, ड्रेस मटेरियल, सूट, कुर्ती आणि हस्तकला वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. टसर, आरी सिल्क, मर्सिलीन (भागलपूर), कातण, मुंगा, ऑर्गनझा, टिस्यु (बनारस, उत्तर प्रदेश), बांधणी, ब्लॉक प्रिंट (राजस्थान), कांठा वर्क, जामदानी, कडवा (कोलकाता), अजरक, शिबोरी (गुजरात), चंदेरी (मध्य प्रदेश), मुंगा व टसर सिल्क (आसाम), तसेच सिल्क कार्पेट आणि काश्मिरी प्रिंटेड साड्या ही या प्रदर्शनाची खास आकर्षणे ठरली आहेत.

सिल्क साड्या, चंदेरी फॅब्रिक, मुगा सिल्क, कोसा सिल्क, कलमकारी साड्या, बनारसी सिल्क, कुर्ती, बेडशीट्स आणि कार्पेट या सर्व वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना खरेदीचा अनोखा अनुभव मिळत आहे.हातमाग, वीणकाम आणि पारंपरिक कलावस्तूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाला पुणेकरांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती