सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने विचित्र अपघात; जीपला जोरदार धडक दिली; दुचाकीचा चेंदामेदा, 8 जखमी
  • बीडमध्ये रेल्वे नव्हे तर विकासाची वाहिनी पोहोचली, गोपीनाथ मुंडेंना ही रेल्वे अर्पण : देवेंद्र फडणवीस
  • मोठी बातमी : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, ठाकरेंची सेना आक्रमक, पोलिसात तक्रार
  • पुणे शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार, तर शुक्रवारी उशीरा कमी दाबाने पाणीपुरवठा
  • कास पठार, प्रतापगडानंतर साताऱ्यातील आणखी दोन स्थळांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा; महाबळेश्वर,पाचगणी ही युनेस्कोच्या यादीत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा अन् एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
 जिल्हा

ग्रामीण भागाला रोजगार व आर्थिक बळकटी देण्यासाठी मनरेगाची कामे वेगाने पूर्ण करा – मंत्री भरत गोगावले

डिजिटल पुणे    17-09-2025 16:18:33

मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही हाताला काम आणि समृद्धीची हमी देणारी योजना आहे. ग्रामीण भागाला रोजगार व आर्थिक बळकटी देऊन कुटुंबाला आणि गावाला समृद्ध करण्यासाठी मनरेगा अंतर्गत कामांना गती देऊन वेळेत पूर्ण करा, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.

राज्यातील मनरेगा कामांची प्रगती आणि जिल्हास्तरावरील अडचणी याबाबत मंत्री गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रोहयो विभागाचे सचिव गणेश पाटील, मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, संबधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मंत्री श्री. गोगावले म्हणाले,  केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी ठरवून दिलेल्या मनुष्यदिन निर्मितीच्या उद्दिष्टांपेक्षा अधिक संख्येने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. लवकरच विभागनिहाय विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.बैठकीत मनरेगा कामकाजाला नवी दिशा, गती आणि दृष्टी देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी, निधी मंजुरी, तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय कार्यवाही याबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती