सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सोलापुर- कोल्हापुरात ढगफुटीसदृश्य पावसाने बळीराजा बेहाल, हजारो हेक्टर चिखलात, 50 हजार हेक्टरी मदत देण्याची रोहित पवारांची मागणी
  • तुळजाभवानी मंदिरात 25 हजार भाविकांसाठी AI सुरक्षा
  • पुणे-नाशिक महामार्गावर मोठी गॅस गळती, टँकरमधून विषारी वायू हवेत पसरला, नागरिकांमध्ये घबराट
  • अजित पवारांच्या प्रचाराच्या छुप्या पॅटर्नचा भाजपला धसका, सरकारी यंत्रणा हाताशी धरुन दादांनी धुरळाच उडवला
  • कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्पात
 जिल्हा

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी संकेतस्थळावर e-KYC सुविधा सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

डिजिटल पुणे    20-09-2025 10:57:07

मुंबई : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर e-KYC ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. पुढील दोन महिन्यात ही प्रक्रिया लाभार्थ्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास  विभागाकडून e-KYC माध्यमातून लाभार्थींचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.  यासंदर्भात आर्थिक मागणी करीत असेल त्यास लाभार्थींनी बळी पडू नये असे आवाहनही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.


 News Feedback

Digital Pune
विमल शंकर यांनी
 20-09-2025 11:33:10

रविवार पेठ लोणार ali junnar

Digital Pune
Priyanka Prashant kajale
 20-09-2025 11:37:48

Sara City chakan

Digital Pune
Dipali pradip dhore
 20-09-2025 12:27:53

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना

Digital Pune
Dipali pradip dhore
 20-09-2025 12:28:27

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना

Digital Pune
Dipali pradip dhore
 20-09-2025 12:29:28

Malvandi dhore

 Give Feedback



 जाहिराती