सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! कार्यकर्त्यांना संधी; ZP मध्ये 5 अन् पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य घेणार? मुख्यमंत्र्यांना पत्र
  • बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
  • : वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न
  • मतदान कुणाला जातं हेच कळतं नाही; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल
 DIGITAL PUNE NEWS

पुण्यात आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय,;पोलिसांनी ५ पीडित महिलांची केली सुटका

डिजिटल पुणे    25-09-2025 17:32:51

पुणे : पुणे पोलिसांनी स्वारगेट परिसरातील दोन आयुर्वेदिक मसाज सेंटरवर छापे टाकून बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. गुलटेकडी परिसरातील मुकुंदनगर आणि मार्केटयार्ड भागातील वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर आणि दिया आयुर्वेदिक सेंटर या ठिकाणी ही कारवाई झाली. पोलीस आयुक्त आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुण्यात स्वारगेट परिसरातील दोन मसाज सेंटर्सवर पोलिसांनी छापा टाकून मोठा पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या कारवाईतून 5 पीडित महिलांची सुटका केली आहे, तर या गैरकृत्यामध्ये सामील असलेल्या 2 महिलांना अटक करण्यात आली आहे.मसाज सेंटर्समध्ये पैशाचे आमिष दाखवून महिलांकडून देहविक्री करून घेतली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत हे रॅकेट उद्ध्वस्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मार्केटयार्ड भागात वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये देहविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारला असता त्याठिकाणी ४ महिला काम करत असल्याचं आढळून आलं. त्या चारही जणींची सुटका करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरची रहिवासी असलेल्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या कारवाईमध्ये मुकुंदनगर भागात दिया आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याठिकाणी तोतया व्यक्ती पाठवून खात्री केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत एका महिलेची सुटका केली तर ३८ वर्षीय महिलेला अटक केली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

पहिल्या कारवाईत पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरात असलेल्या 'वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर'वर छापा टाकला. येथे देहविक्री सुरू असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणाहून पोलिसांनी 4 महिलांची सुटका केली आणि छत्रपती संभाजीनगर येथील एका महिलेला अटक केली आहे.

तर दुसऱ्या कारवाईत मुकुंदनगर भागात 'दिया आयुर्वेदिक मसाज सेंटर' मध्येही वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला पाठवून खात्री केली आणि त्यानंतर येथेही छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका महिलेची सुटका केली आणि 38 वर्षीय महिलेला अटक केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती