पिंपरी : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा अतिरिक्त तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. या कटाच्या मागे नेमकं कोण आहे? याचा शोध घेण्यासाठी शासनाकडून एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळचे अजित पवारांच्या जवळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा अतिरिक्त तपास करण्यासाठी आता एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. याप्रकरणी २०२३ मध्ये तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई करून सात गुन्हेगारांना अटक केली होती, ज्यांच्याकडून नऊ पिस्तुलं जप्त केली होती. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबतचे आदेश दिले आहे. आपल्याला मारण्याचा कट रचण्यात आला होता, असा प्रश्न सुनील शेळके यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ २ पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी समिती स्थापन केली आहे. २६ जुलै २०२३ रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई करण्यात आली होती या कारवाईच्या दरम्यान सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले होती त्यांच्याकडून तब्बल ९ पिस्तूल ४२ काडतुसे, धारदार कोयते जप्त करण्यात आले होते. यातील आरोपी हे पुणे जालना आणि मध्य प्रदेश येथील गुन्हेगार होते. तपासा दरम्यान ते सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचत असल्याचे स्पष्ट झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा तपास अतिरिक्त करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २६ जुलै २०२३ रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई केली होती. यामध्ये तपासाअंती सात सराईत गुन्हेगारांना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी हे मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातले असून आमदार शेळके यांचे कोणतेही वैयक्तिक वैर त्यांच्याशी नव्हते. त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणीतरी बडा व्यक्ती असणार असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मग या सगळ्यांमागे हे पैसे कोण पुरवतंय? , आणि “माझ्या हत्या कटामागचा सूत्रधार कोण? , असा थेट सवाल शेळके थेट विधानसभेत उपस्थित केला होता.
याविषयी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, या घटनेच्या अनुषंगाने माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे. ती सर्व माहिती या समितीला मी देणार आहे. समितीने या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करावा व याच्या मुळाशी कोण आहे त्याचा शोध घ्यावा असे सांगितले. तसेच तळेगाव परिसरामध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीवर देखील रोख लावण्यासाठी कठोर अशी पावले उचलावीत.