सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! कार्यकर्त्यांना संधी; ZP मध्ये 5 अन् पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य घेणार? मुख्यमंत्र्यांना पत्र
  • बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
  • : वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न
  • मतदान कुणाला जातं हेच कळतं नाही; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल
 DIGITAL PUNE NEWS

एकनाथ शिंदेंचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला;जिल्ह्यात खळबळ!”

डिजिटल पुणे    04-10-2025 14:42:48

सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी झाला प्राण घातक हल्ला झाला आहे. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.महेश चिवटे हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे.

सुपारी घेऊन माझ्यावर हल्ला

आपल्यावर झालेला हल्ला हा दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांची सुपारी घेऊन करण्यात आल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होते. तर त्यांची बहिणी रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. चिवटे यांच्या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा समोर आला आहे.

आज माझ्या सकाळी मी माझ्या शेतातून येत असताना मताई कारखान्याचे सर्वेसर्वा रश्मी बागल व दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने माझी गाडी अडवली. त्याने मला लाठा, काठ्याने खाली पाडून बेदम मारहाण केली. मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मी पोलीस स्टेशनला फोन केला आहे. मी एवढच सांगेन यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. तुलाही भाऊ आहे हे लक्षात ठेव असा इशारा महेश चिवटे यांनी दिला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत तपास सुरू आहेत संपूर्ण तपासानंतर सर्व गोष्टी समोर येते.

महेश चिवटे यांनी रुग्णालयातूनच आपल्यावरील हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मकाई कारखान्याचे सर्वेसर्वा रश्मी बागल-कोलते आणि त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांनी मनोज लांडगे नावाच्या तरुणाला सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणला आहे.

करमाळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर यांच्यावर हा प्राणघातक हल्ला सकाळी झाल्याची माहिती समोर आली, महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. महेश चिवटे यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्यावरती या हल्ल्याप्रकरणी आरोप करण्यात आले आहेत. सध्या शिंदेंच्या शिवसेनेतील वाद विकोपाला गेला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले होते. मात्र आज सकाळी महेश चिवटे शेतातून येत होते त्यावेळी त्यांच्यावर हा प्राण घातला झाला. हा हल्ला रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून झाल्याचं गंभीर आरोप केला आहे. दिग्विजय बागल यांनी विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदे यांची उमेदवारी घेऊन लढवली होती. त्यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे देखील आले होते, मात्र जिल्हाप्रमुख महेश चिमटे आणि बागल यांच्यातील वाद कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे, यानंतर आता याचा रूपांतर हल्ल्यात झाला आहे, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत तपास सुरू आहेत संपूर्ण तपासानंतर सर्व गोष्टी समोर येते.


 Give Feedback



 जाहिराती