मुंबई : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली आहे. सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावरुन गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रान उठवत योगेश कदम यांच्यावर टीकेची झोड उठवली. अनिल परब यांनी योगेश कदमांनी कशाप्रकारे नियम डावलून सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला, याची क्रोनोलॉजी उलगडून सांगितली.
योगेश कदम यांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मंजूर केला. शस्त्र परवाना मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो, त्यानंतर पोलीस त्याची छाननी करतात. पोलीस संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी आणि त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे या सगळ्याची माहिती घेतात. संबंधित व्यक्तीच्या जीवाला खरोखरच धोका आहे की नाही, हे तपासतात. त्यानंतर पोलिसांना वाटलं तर शस्त्र परवाना दिला जातो. शस्त्र परवाना देताना संबंधित व्यक्तीचे समाजातील स्थानही पाहिले जाते. मात्र, सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही.
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पोलिसांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना नाकारला होता. त्यानंतर सचिन घायवळ याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर अपील केले. तेव्हा पोलिसांनी आपली बाजू मांडत सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी योगेश कदम यांना सांगितली. मात्र, योगेश कदम यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले. सचिन घायवळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते 20 वर्षे शाळेत क्रीडा शिक्षक होते. त्यांना या व्यवसायात अनेक स्पर्धक आहेत. त्यांना दररोज मोठ्या रक्कमेची देवाणघेवाण करावी लागते. या कारणामुळे योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर करत असल्याचे म्हटले होते.
मात्र, सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सख्खा भाऊ आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी त्याचे गांभीर्य कमी होत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पोलिसांनी सचिन घायवळ याला शस्त्र परवाना नाकारला होता. त्यानंतर सचिन घायवळ याने गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासमोर अपील केले. तेव्हा पोलिसांनी आपली बाजू मांडत सचिन घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी योगेश कदम यांना सांगितली.
मात्र, योगेश कदम यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले. सचिन घायवळ हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते 20 वर्षे शाळेत क्रीडा शिक्षक होते. त्यांना या व्यवसायात अनेक स्पर्धक आहेत. त्यांना दररोज मोठ्या रक्कमेची देवाणघेवाण करावी लागते. या कारणामुळे योगेश कदम यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर करत असल्याचे म्हटले होते.