पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या खेळाडूंनी ॲथलेटिक्समध्ये सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याचा मान मिळवत पुन्हा एकदा या खेळावरील आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत एकूण ९ सुवर्णपदके व ४ रौप्यपदके मिळवून सर्वसाधारण मुले व मुली गटात देखील विजेतेपद पटकावले.मेहनत, शिस्त आणि संघभावना याच्या आधारे निश्चितच यशाला गवसणी घालता येते हे घोलप महाविद्यालयाच्या खेळाडूंनी परत एकदा सिद्ध केले.
या देदीप्यमान यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. अजितदादा पवार साहेब, उपाध्यक्ष मा. राजेंद्रजी घाडगे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.