पुणे – जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, गणेशनगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत दोन गटांमध्ये तृतीय क्रमांकाचे विजेतेपद मिळवले आहे.
१४ वर्षाखालील मुलींच्या गटात कलमाडी हायस्कूलने सिंबायोसिस स्कूलवर विजय मिळवला, तर १७ वर्षाखालील मुलांच्या गटात कलमाडी हायस्कूलने प्रियदर्शनी स्कूलवर मात करत तृतीय स्थान पटकावले.मुलांच्या सामन्यात संघनायक रोहित लोखंडे याने दमदार खेळ करत सलग दहा गुणांची कमाई केली. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.मुलांच्या सामन्यात संघनायक रोहित लोखंडे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सलग दहा गुण मिळवून संघासाठी निर्णायक योगदान दिले तसेच त्याला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली कुलकर्णी यांनी सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. संघाला क्रीडा शिक्षक महेश पाटील व प्रशिक्षक मयूर बागे यांचे मार्गदर्शन लाभले.या दुहेरी यशामुळे डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलने पुन्हा एकदा जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.या यशामुळे शाळेचे नाव पुन्हा एकदा जिल्हास्तरीय क्रीडा क्षेत्रात उजळले आहे.
