सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! कार्यकर्त्यांना संधी; ZP मध्ये 5 अन् पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य घेणार? मुख्यमंत्र्यांना पत्र
  • बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
  • : वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न
  • मतदान कुणाला जातं हेच कळतं नाही; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल
 शहर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

डिजिटल पुणे    13-10-2025 11:19:06

पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख रुपयांचा धनादेश राजर्षि शाहू सहकारी बँकेच्यावतीने सुपूर्द करण्यात आला. पुरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले.यावेळी राजर्षि शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष शांताराम धनकवडे, उपाध्यक्षा कमल व्यवहारे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब डोईफोडे आदी उपस्थित होते.राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून राज्यशासनाच्यावतीने नागरिकांचे जीवनमान पूर्वपदावर आणण्याचे काम सुरु आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता विविध क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येऊन सढळ हाताने मदत करीत आहे. पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले.


 Give Feedback



 जाहिराती